Home महाराष्ट्र माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा संपन्न

माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा संपन्न

115

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जानेवारी):-महागाव तालुक्यातील माळेगाव येथे डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जि. प. माजी सदस्य वर्षाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली अॕड.गोपाळराव भगत यांचे हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव मोरे,माजी आमदार विजयराव खडसे,अॕड.अप्पाराव मैंद, से.नि.वनाधिकारी डी. जी. गोस्वामी. महेंद्र मानकर, माजी जि.प.उपाध्यक्ष दौलतराव नाईक ,भीमराव भवरे ,नरेंद्र भवरे ,एस.टी.भगत ,नानासाहेब भवरे, सरपंच आडे , माजी सरपंच मा.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक विलास पाईकराव यांनी केले. आणि मधूकर वाघमारे यांनी सुत्रसंचालन केले तर उपा.पडाघणे यांनी आभार प्रदर्शन केले.दौलतराव नाईक यांनी या प्रसंगी गाव भोजन दिले.यावेळी काही सत्कारमूर्तीचा सत्कार, संविधान – ग्रंथ देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाला गावातील भरपूर उपस्थित होती.नव्या युगाच्या मार्गदर्शकाचा पुतळा ग्रामस्थांना प्रेरणा देत राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here