Home महाराष्ट्र सातपुर अंबड लिंक रोड लगत हार्डवेअरच्या दुकानात कोयत्यांची विक्री; अंबड पोलिसांनी छाप्यात...

सातपुर अंबड लिंक रोड लगत हार्डवेअरच्या दुकानात कोयत्यांची विक्री; अंबड पोलिसांनी छाप्यात पकडला मुद्देमाल

138

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शातांराम दुनबळे़)

नाशिक(दि.15जानेवारी):-नविन नाशिक परीसरात व शहरात कोयता गँगने नव्याने दहशत माजविण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी हातात फिल्मी स्टाईलने कोयते घेऊन दहशत निर्माण करणे, एकमेकांवर वर्चस्ववादातून थेट कोयत्याने मारहाण करणे या घटनांनी परीसर व शहर हादरले असतानाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हार्डवेअरच्या दुकानातून अंबड पोलिसांनी तब्बल १२ कोयते जप्त केले आहेत. हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या हातात प्राणघातक कोयते घेऊन परस्पर विरोधी टोळीवर हल्ला करणे सर्व सामान्य नागरिकांना लुटण्यासाठी कोयत्याचा वापर करणे, दहशत पसरविण्यासाठी हातात कोयते घेऊन धिंगाणा घालणे, दहशत पसरविणे दरोडा टाकण्यासाठी विविध कोयत्याचा वापर करणे याचप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका हत्येप्रकरणात देखील या कोयत्याचा वापर झाल्याने शहरात बिनदिक्कतपणाने कोयते विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबड लिंकरोडवरील संजीवनगर येथील संशयित महेबूब मुझम्मिल खान (वय ३९) रा. संजीवनगर याच्यां न्यू बबलू हार्डवेअर नावाच्या दुकानातून बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून तीन हजार दोनशे रुपये किंमतीचे बारा प्राणघातक कोयते पोलिसांनी जप्त केले आहे आहेत. या कारवाईमुळे थेट हार्डवेअरच्या दुकानातच प्राणघातक कोयते खुलेआम विकले जात असल्याचे उघड झाले आहे. यातील संशयित आरोपीला अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पानसरे व इतर कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here