Home Education कुऱ्हा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती संपन्न

कुऱ्हा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंती संपन्न

105

✒️शशांक चौधरी(तिवसा प्रतिनिधी)

तिवसा(दि.14जानेवारी):-अशोक शिक्षण संस्था अशोक नगरद्वारा संचलित कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती राज्यशास्त्र विषय समिती अंतर्गत साजरी करण्यात आली. प्राचार्या सौ. एस.पी. सामुद्रे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ भोसले व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व हारअर्पण करण्यात आले. त्याकरिता वर्ग 7अ वर्ग 9 ब व वर्ग 12 कचे वर्गनायक पूजना करता उपस्थित होते.

इयत्ता 5 ते 9 व 11वी च्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विषय समिती प्रमुख प्रा कु. एस. पी. ढोले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विषय समिती उपप्रमुख प्रा. पी.एम. श्रीखंडे सर, एस. एस. चव्हाण सर व एस. एस. इरपाते , पी. ए. पडोळे सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकवृद शिक्षकवृद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here