गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गेला सत्कार
सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.5जानेवारी):-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती शिवजयंती महोत्सव समिती ब्राम्हणगाव च्या वतिने दत्त मंदिर येथे साजरी करण्यात आली.यावेळी रविराज धबडगे सचिव मराठा सेवा संघ उमरखेड यांनी सावित्रीबाईच्या समाजसेवी धोरणावर प्रकाश टाकला.तसेच सौ मंगल अमोल मोरे यांनी महिलांना सावित्रीबाई यांच्या त्यागाची भुमिका विशद करुन सांगीतली.व येणारी सावित्रीबाई जयंती ब्राम्हणगांवातील महिला पुढाकार घेवुन करतील अशी ग्वाहि दिली.
शाहरुख पठाण यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, घरोघरी सावित्रीच्या लेकी तयार झाल्या पाहिजेत. सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव प्रत्येक महिलांना असली पाहिजे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावातील प्रथम नागरिक गरुडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य नयन पुदलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड, अरविंद धबडगे,देवराव मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आयोजकांतर्फे गावातील शिष्यवृती परिक्षा व NMMS परिक्षेमध्ये पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पेन व वही देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन शिवाजी रंधे यांनी तर आभार प्रदर्शन संदिप धोबे यांनी केले. यावेळी गावातील विपिन कोथळकर,गजानन मुक्कावार,बालु घोडगे,दिनकर वाठोरे,रामराव साळेकर व अनेक ज्येष्ठ मंडळी व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
