
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.5जानेवारी):- येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या प्रबुद्ध विद्याभवनमध्ये “ सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी केली.सकाळी मंगळवार पेठेतून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. येथील भीमस्फूर्ती भूमी विहार( शेरी) येथील पटांगणावर जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावित्री माई फुले यांच्या बद्दल भाषणे दिली.
यानंतर सावित्रीमाई रंगोत्सव संपन्न झाला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंच्या चित्रामध्ये सुंदर रंग भरण केले.कार्यक्रमाची संकल्पना व रचना संस्था सचिव मिलिंद अहिवळे यांनी केली तर व्यवस्था प्रबुद्ध चे मुख्याध्यापक यशवंत कारंडे, शिक्षक महादेव गुंजवटे, जयश्री होणराव, वनिता कांबळे/मोरे व संघमित्रा अहिवळे यांनी केली. यावेळी भीमजयंती मंडळ २०२२ चे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे उपस्थित होते.
