Home महाराष्ट्र मंत्र्यांच्या खाजगी पैशातून रस्ते बनवत आहेत का?

मंत्र्यांच्या खाजगी पैशातून रस्ते बनवत आहेत का?

98

जळगाव मधील रस्ते मागील दहा वर्षांपासून बनवले नाहीत.संपुर्ण रस्ते उखडले .म्हणून नागरिकांचे डोके फिरले.कसातरी जळगाव कौर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंत रस्ता बनवला.या रस्त्याची ् माहिती,लांबी रूंदी ,कामाची माहिती, मक्तेदार,त्यांचे दुरूस्ती चा कार्यकाळ ,त्यांचे आयुष्य याबाबत माहिती दिली पाहिजे.आम्ही येथून व्हिडिओ मेसेज ही दिला.जबाबदार अभियंत्यांना सुचवले.पण तसे न करता येथे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, गुलाबराव पाटील , गिरीश महाजन यांच्या दुरदृष्टीने हा रस्ता बनवला, सुरेश भोळे यांनी भुमिपूजन केले म्हणून हा रस्ता बनला.हा रस्ता नागरिकांचा करातून जमवलेल्या निधीतून बनवला नसेल कदाचित म्हणूनच हा असा बोर्ड असेल .हा रस्ता येथे नांवे लिहीलेल्या नेत्यांच्या खाजगी संपत्ती तून बनवलेला असावा,असा मेसेज हा बोर्ड देत आहे.

अजूनही नेत्यांनी लोकांना मुर्ख बनवणे थांबवले नाही.जळगांवचे लोक इतके मुर्ख आहेत,असा मेसेज महाराष्ट्र व देशात पोहचलेला दिसतो.
प्रश्न असा आहे कि,या रस्त्यासाठी शिंदे किंवा फडणवीस यांचे काय योगदान आहे?त्यांनी किती रक्कम त्यांच्या अधिकृत किंवा अनधिकृत उत्पन्नातून दिली?हे सुद्धा या बैनरवर लिहीले पाहिजे.गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांचे हा रस्ता बनवण्यासाठी काय योगदान आहे?जर यांचेच योगदान असेल तर तसे या बोर्डवर लिहीले पाहिजे. जर यांच्याच खाजगी योगदानातून हा रस्ता बनवला असेल तर योगदान उशीरा का दिले?हेच थोडे आधी दिले असते तर नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला नसता.मध्यंतरी अपघात होऊन माणसे अपंग झाली नसती,मेली नसती.शिंदे , फडणवीस, गुलाबराव, महाजन यांनी खाजगी योगदान दिले असेल तर आम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे.पण एकनाथ खडसे प्रश्न करतील कि,हा पैसा यांनी आणला कोठून? काही शेती,घर वगैरे विकले का?कुठे हात मारला का?पैशाचा स्रोत जाहीर केला तर आम्ही सुद्धा तोच मार्ग अनुसरला तर बिघडले. कुठे?तोच मार्ग इतर नेते अनुसरतील.

जर शिंदे, फडणवीस, गुलाबराव, महाजन, भोळे यांनी या रस्त्यासाठी आर्थिक योगदान दिले असेल तर तो आकडा बोर्डवर टाकला पाहिजे. आम्ही नागरिकांनी कर भरला आहे,व्यापाऱ्यांनी जीएसटी भरली आहे.तर हे पैसे देणाऱ्यांची नांवे या बोर्ड वर कराचा आकडा सहित वाढवण्यात यावीत.नाहीतर मेहनत करे मुर्गा और अंडा खाये सुभान.असे होऊ नये.

आमचे आमदार सुरेश भोळे यांनी भुमिपूजन केल्याने रस्ता बनला असेल तर आम्ही आमदार भोळेंना विनंती करतो कि, तुम्ही रोज एका रस्त्याचे भुमिपूजन करा.नारळ,कुदळ,गुलाल,अगरबत्ती आम्ही पुरवतो.तो खर्च आम्ही करतो. दोन चार दिवस दारू पिणार नाही.ते पैसे वाचवून आमदाराला मदत करू. का?आमचे शहरातील रस्ते तरी बनतील.

असे भाजपचे म्हणजे सत्ताधारी मंत्र्यांची नावे लिहून आचारसंहिता भंग केली आहे.सरकारी निधीचा उपयोग केला असेल तर कायदेशीर रस्त्यांची माहिती असलेला बोर्ड येथे लावला पाहिजे.आमचे म्हणणे चूक कि बरोबर ?हे या मंत्र्यांनी आपल्या सचिवाला किंवा सिपायाला विचारून खात्री करावी.आणि जर हा बोर्ड लावण्यास शिंदे, फडणवीस, गुलाबराव, महाजन,भोळे यांची सहमती घेतली नसेल तर हा बोर्ड हटवण्यात यावा.आणि त्या जागी कायदेशीर रस्त्यांची माहितीचा बोर्ड लावण्यात यावा.

मंत्र्यांनो, आमदारांनो,आता खूप झाले, जळगावच्या लोकांना मुर्ख बनवणे थांबवा.आता जळगाव चे मतदार पैसे घेऊनही मत देणार नाहीत.सर्वांचे मत तुमच्याच खात्यात पडेल,असे इव्हीएम चा शोध घ्या.तरीही हा रस्ता बनवण्याची सुबुद्धी आमच्या भोळे आमदार महोदयांना झाली त्याबद्दल आम्ही या बोर्ड जवळ त्यांचा सत्कार करणार आहोत.हक तो बनता है,आमदार का!फर्ज बनता है मेरा,तुम्हारा,हमारा.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,
जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here