Home महाराष्ट्र 2023 नवीन वर्षाचे स्वागत, धुंदीत नव्हे तर! शुद्धीत करा!!

2023 नवीन वर्षाचे स्वागत, धुंदीत नव्हे तर! शुद्धीत करा!!

82

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.30डिसेंबर):-भगवती देवी विद्यालय, देवसरी ता.उमरखेड येथून ढोल ताशा वाजत गाजत विद्यालयाचे बॅनर घेऊन सकाळी साडेसात वाजता देवसरी पूर्ण गावात माननीय शिक्षणाधिकारी साहेब (माध्य.) यवतमाळ यांचे आदेशान्वये प्रभात फेरीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सफुर्तपणे विविध नारे देवून त्यामध्ये दारू पळवा ,गाव वाचवा… कशापायी दारू पिता ,आपल्या घराला उध्वस्त करता… मद्दाची सोडली संगत, संसाराची झाली बरकत… दारुणे झिंगला, संसार भंगला… मद्दकरते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट… नशा करी,जीवनाची दुर्दशा.

असे विविध नारे देत देवसरी येथील लोकांचे प्रभात फेरीमुळे लक्ष वेधून घेतले. चिमुकले विद्यार्थी खरोखर किती महत्त्वाचा चांगला संदेश देत आहेत त्यांचे पालन ग्रामस्थांनी केले पाहिजे असे देवसरी येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा होत होती. विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर करून प्रभात फेरीचे विसर्जन करण्यात आले. यावेळेस विद्यालयातील पाच ते दहा चे विद्यार्थी, मुख्याध्यापक पि.डी.मिरासे शिक्षकवृंद दिनेश वानरे दिगंबर माने राजेश सुरोशे अनिल आल्लडवार भागवत कबले पांडुरंग शिरफुले मारोती महाराज अरविंद चेपुरवार आणि भागवत जाधव यांची उपस्थिती होती. प्रभात फेरीचे सर्व देवसरी येथील ग्रामस्थांनी स्वागत केले. असे म्हणावयास हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here