Home पुणे संभाजी ब्रिगेडचे पुणे येथे रौप्य महोत्सवी अधिवेशन….

संभाजी ब्रिगेडचे पुणे येथे रौप्य महोत्सवी अधिवेशन….

249

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

पुणे(दि.22डिसेंबर):-संभाजी ब्रिगेडच्या पुणे येथे होणा—या 25 व्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाला खेड तालुकयातील पदाधिकारी कार्यकर्ते, सुशिक्षित बेरोेजगारसह, जेष्ठ नागरिक शेतकरी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष व प्रवत्ते कैलास मुसळे यांनी केले आहे. संभाजी ब्रिगेडची 25 वर्षे परिवर्तनाची पुर्ण होत असुन संभाजी ब्रिगेड नेमक करते तरी काय ध्येय धोरण उदिष्ट यांचा संपुर्ण आढावा या रौप्य महोत्सवी अधिवेशन घेतला जाणार असुन आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने सामाजिक, शैक्षणिक राजकीय, आर्थिक, आरक्षण, रोजगार, नोकरदार, विदयार्थी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, गडकिल्ले, संस्कृती, इतिहास, आशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले संभाजी ब्रिगेड मध्ये सामील का व्हायचं या सर्व गोष्टीचे सविस्तर मार्गदर्शन संभाजी बिग्रेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात केले जाणार आहे.

संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनासाठी एक दिवस समाजासाठी एक दिवस आपल्या उज्वल भविष्यासाठी पैसा आकांक्षा ज्ञान, शिक्षण अनुभव कैाशल्य,प्रेरणा, इच्छाशक्ती,व यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागत यावर अतिशय सुंदर मार्गदर्शन लाभणार असुन या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लोकनेते शरदचंद्रजी पवार (मा केंद्रीय मंत्री ) पृथ्वीराज चव्हाण (मा. मुख्यमंत्री,) श्रीनिवास पाटील (खासदार लोकसभा) श्रीमंत छत्रपती शाहु महाराज कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थित तर प्रविणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असुन हा कार्यक्रम बुधवार दिनांक 28 डिसेंबर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी होणार असुन संभाजी ब्रिगेडच्या या 25 व्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे खेड तालुक्यातील पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास मुसळे, विशाल जरे, गणेश गारगोटे, संभाजी तालुका अध्यक्ष सुरज टोपे,दिपक मोरे, राजु गारगोटे, गणेश बहिरट, निलेश जरे, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here