Home Education सामान्य कामगाराचा मुलगा झाला MBBS डॉक्टर…

सामान्य कामगाराचा मुलगा झाला MBBS डॉक्टर…

202

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरूनगर(दि.22डिसेंबर):-खेड तालुक्यातील चांदुस हे वडील शिवाजी कारले व आई मंगल कारले यांचे गाव व
ऋषिकेश त्यांचा लहान मुलगा ऋषिकेशने लहानपणीच डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले होते. आयुष्यात खडतर संघर्ष करत डॉक्टर किंवा इंजिनिअर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास केला. १० वी व १२ वी ला खूप चांगले अपेक्षित मार्क्स मिळवले गावात अनेक सुख सुविधा नसल्याने गावात कोणताही MBBS डॉक्टर उपलब्ध नाही. आजवर कुणीही MBBS डॉक्टर झालेले नाही ;त्यामुळे गावात आपण पहिला MBBS डॉक्टर व्हावं, व समाजाप्रती असलेली आपुलकी, समाजाची सेवा करता यावी ही तळमळ व चिकाटी होती.

ऋषिकेशला घडवण्यासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे काम चुलते मोठे बंधू श्री. रामदास कारले व छोटे बंधू श्री शरद कारले यांनी केले. परदेशात फिलिपाईन्स शहरात डॉक्टर पदवी साठी जाण्यास होकार दिला तसेच त्यांनी आर्थिक मदत ही केली.

चुलते श्री रामदास कारले, श्री शरद कारले व वडील शिवाजी यांचा खंबीर पाठिंबा तसेच अडीअडचणीत साथ दिली.त्यांचे चुलते श्री .रामदास व श्री. शरद कारले( चुलते ) त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय साधा, तल्लख बुद्धीचा मुलाचा MBBS ऍडमिशनचा मार्ग मोकळा झाला , अथक परिश्रम, मेहनत, खूप अभ्यास करून कु.ऋषिकेश डॉक्टर झाला.गावातील ग्रामस्थाकडून, तसेच सोशल हेल्प अँड हेल्थ फाउंडेशन शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच प्रमाणे सर्व तालुक्यांतुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here