Home चंद्रपूर भाजयुमोच्या वतीने संत जगनाडे महाराज शोभायात्रेचे स्वागत-कार्यकर्त्यांनी केले भाविकांना दुधाचे वितरण

भाजयुमोच्या वतीने संत जगनाडे महाराज शोभायात्रेचे स्वागत-कार्यकर्त्यांनी केले भाविकांना दुधाचे वितरण

64

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21डिसेंबर):– संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 21 डिसें, रोजी चंद्रपूर महानगरात निघालेल्या भव्य शोभायात्रेचे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने स्वागत करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांनी तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना तसेच आबाल वृध्दांसाठी कस्तुरबा मार्गावरील अहीर कॉम्प्लेक्स समोर स्वास्थ्यवर्धक हळदी मिश्रीत दुधाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राजु घरोटे, प्रमोद शास्त्रकार, सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, नगरसेवक प्रदीप किरमे, विकास खटी, पुनम तिवारी, मयुर झाडे, राजेश वाकोडे, सुभाष आदमने, राहुल सुर्यवंशी, गौतम यादव, चेतन शर्मा, प्रमोद त्रिवेदी यांचेसह भाजपा, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here