Home अमरावती आंतरराष्र्टीय स्काऊट गाईड जांबोरीत अमरावती जिल्ह्यातील 30 स्काऊट गाईड घेणार सहभाग

आंतरराष्र्टीय स्काऊट गाईड जांबोरीत अमरावती जिल्ह्यातील 30 स्काऊट गाईड घेणार सहभाग

144

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.19डिसेंबर):-दिनांक 21 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधित कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात आयोजित पहिल्या आंतरराष्र्टीय कलचरल स्काऊट गाईड जांबोरीत अमरावती जिल्ह्यातील *पंचशिल माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा बहिरम ता.चांदुरबाजार* शाळेच्या गाईड कॅप्टन शुभांगी पापळकर आणि स्काऊट मास्टर जीवन सदाशिव यांच्या नेतृत्वात 09 स्काऊट व 09 गाईड आणि *तकतमल ईंग्लीश हायस्कुल साईनगर अमरावती* चे स्काऊट मास्टर मयुर माद्रप यांच्या नेतृत्वात 09 स्काऊट असे एकुण 30 सदस्य सहभागी होत आहेत.

अमरावती जिल्ह्याच्यावतीने विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून त्याची शाळापातळीवर उत्तम तयारी करुन घेण्यात आल्याचे पंचशिल माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनिष काटे यानी सांगीतले.

भारतात आयोजित पहील्या आंतरराष्र्टीय स्काऊट गाईड जांबोरीत अमरावती जिल्ह्यातून सहभागी होणार्‍या सर्व स्काऊट गाईड व स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन यांचे अभिंनंदनासह उत्कृष्ठपणे सहभाग नोंदविण्यासाठी प्रिया देशमुख ,जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिका (प्राथ.), प्रफुल कचवे जिल्हा आयुक्त स्काऊट तथा शिक्षणाधिकारी (माध्य.) तसेच जिल्हा संघटक रमेश जाधव, वैशाली घोम यानी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here