Home बीड संजय मस्के,राजेश ढेरे ,गणेश जाधव,विजेंद्र डूलगच यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर

संजय मस्के,राजेश ढेरे ,गणेश जाधव,विजेंद्र डूलगच यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर

147

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.20डिसेंबर):-पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 सालचा लोकरत्न पुरस्कारसंजय मस्के,राजेश ढेरे ,गणेश जाधव,विजेंद्र डूलगच यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी दुपारी 12 : 30 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित लोकरत्न पुरस्कार कार्यक्रम होणार भगवत वैद्य प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन केले आहे.

बीड जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी नगर रोड येथील कार्यालयात गरीब मुलांना अभ्यास करण्यासाठी स्टडी सर्कल चालू केले आहे. वार्षिक फी फक्त 50 मध्ये सर्व पुस्तके उलब्ध आहेत. प्रेस लाईन कडे एक मोठे स्टडीसर्कल,हॉल,वाचनालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. डॉ. उपप्राचार्य राजेश ढेरे यांनी अत्यंत अवघड परिस्तीत शिक्षण घेऊन आज ते स्व. सावरकर महाविद्यालय येथे कार्यरत आहेत.त्यांनी अनेक मुलांच्या परीक्षा फी भरल्या आहेत. अनेक लोकांना ते नेहमी मदत करीत असतात.उच्च शिक्षण घेऊन आज एक चांगल्या पद्धतीने समाज उपोयोगी कामे करीत आहेत. गणेश जाधव यांनी दैनिक रिपोर्टर पेपर मधे क्राईम स्टोरी लिहिण्याचे काम चालू केले.त्याच बरोबर त्यांनी अनेक समाज हिताच्या बातम्या बनविल्या, आज ते उपसंपादक पदी काम पाहत आहेत.त्यामुळे त्यांना मानसन्मान नेहमी मिळत असतो.

पेठ बीड येथे राहणारे समाज सेवक विजेंद्र भाऊ डूलगच यांनी अनेक गोर गरीब लोकांना कपडे, अन्न धान्य,किराणा ,पैसे देऊन आपली समाज सेवा करणे हे काम चालू आहे.अनेक लोकांच्या प्रशाकिय अडचणी सोडविण्याचे काम पण करत आहेत.त्यांनी गोशाळा येते पण जनावरांना चारा दिला आहे. अनाथ महीला, मुलींना कपडे वाटप केले आहे. कोरोन काळात अनेक कुटुंबांना किराणा सामान देले आहे. या कामांची दखल घेऊन पुरोगामी पत्रकार संघाने आदर्श समाज सेवा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक ठाकूर साहेब, अजित पवार बीड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, बीड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी उत्तमराव पाटील , संजय मस्के जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब, देशमुख बीड. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 तोंडे साहेब,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे साहेब, बीड जिल्हा पोलिस अप्पर अधीक्षक सचिन पांडकर साहेब,बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते, जिल्हा जल संधरान अधिकारी परांडकर साहेब जायकवाडी,देशमुख साहेब प्रभारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक साहेब, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी मंत्री सुरेश नवले साहेब,रणजित शिरसगर कॉन्ट्रॅक्टर, निकम कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी, शिंदे सा. आयुक्त समाज कल्याण , बिजेंद्र झा. एल. डी. एम. ,बीड जिल्हा अध्यक्ष बिजेपी राजेंद्र मस्के साहेब,अमर नाईकनवडे शिव सेना सभापती न. पा.बीड, नगरसेवक शुभम धुत,वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,सुभाष चौरे बीड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद, अँड.प्रकाश कवठेकर जिल्हा परिषद सदस्य,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्यार्थ्यां वस्तीगृह प्रदेश अध्यक्ष दिनेश लाला पवार, बीड तहसीलदार सुहास हजारे,आर. एफ. ओ. अशोक काकडे ,सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी ,खरात जिल्हा ग्रामोद्योग केंद्र बीड,राजूशेठ बंब माजी अध्यक्ष रोटरी क्लब बीड,विजयकुमार वाव्हळ प्रदेश अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य., प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,विजय दादा पोकळे सी. एम. डी. महीला विकास संघ महाराष्ट्र राज्य, शिवराज बांगर सामाजिक कार्यकर्ते ,अलीम पटेल आर.सी.सी.बांधकाम कामगार नेते, मोमिंद्दिन शेख बांधकाम कामगार नेते, चंद्रकांत कांबळे राशन हक्क विकास समिती अध्यक्ष मराठवाडा विभाग पुरोगामी पत्रकार संघ, उत्तम ओव्हाळ बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ,
यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here