Home महाराष्ट्र चोरिचे वाहन शोधुन मुळ मालकाला परत करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा हद्रय सत्कार

चोरिचे वाहन शोधुन मुळ मालकाला परत करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा हद्रय सत्कार

128

✒️बळवंत मनवर(विषेश प्रतिनिधी)

अकोला(दि.17डिसेंबर):- येथील वाहतूक पोलीस कर्मचारी हे नेहमीच आपल्या कामात कर्तव्यदक्ष असुन चोरीचे वाहन शोधुन काढतात व त्या मालकाच्या स्वाधीन करतात अश्या कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचारी श्री ज्ञानेश्वर चिकटे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे,ॲड.रोशन तायडे, विशाल भोसले यांनी सत्कार करण्यात आला आहे.वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या अमलदार वाहनधारकांना नियमाच्या चौकटीत राहून वाहन चालविण्यास दंड करतात त्यासाठी त्यांना नेहमी सतर्क राहावे लागते.

या सतर्कते मुळे शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत अमलंदार दिलीप हिंगणकर ज्ञानेश्वर चिकटे, सचिन दवंडे यांनी वाहनाची चोरी उघडकिस आणली सागली गजबजलेल्या गांधी रोडवरील चांदेकर चौकात कार्यरत असताना दुचाकी एम. एच. ३० ए.व्ही. 4137 बाबत संशय आला त्यांनी वाहन थांबवून विचारपूस केली वाहनाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता वाहन चालक जवळ कोणत्याही प्रकारचे आवश्यक कागदपत्र नसल्याचे निदर्शनास आले वाहन चालकास विचारलेल्या प्रश्नांची उत्तर उडवा उडवीचे उत्तर दिली कागदपत्र आणून दाखवतो असे म्हणून वाहन चालक तशीच दुचाकी सोडून पळ काढला परंतु वाहन चालक दुचाकी घेण्यास परत आला.

नाही वाहन चालक परत न आल्याने पोलीस अमंलदार यांनी गाडी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे आणून चौकशी अतीम दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध लावला ही दुचाकी डॉ.प्रमोद राहुडकर रा.अमानवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांची असल्याबाबत समजले दुचाकीच्या मूळ मालकास मोबाईल वरून संपर्क करून माहिती विचारली असता त्यांनी सदरची दुचाकी त्यांच्या मालकीची असून सन 2016 मध्ये बार्शीटाकळी बायपास येथून चोरीस गेल्याबाबत कळविले दुचाकी चोरी गेल्या बाबत त्यांनी बार्शीटाकली पोलीस स्टेशनला देखील फीर्याद नोदविली होती असे असल्याबाबत कळविले त्यामुळे सर्व सोईस्कार पार पाडून गाडी बार्शीटाकळी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिली व गाडी मालकाला परत करण्यात आली आतापर्यंत ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी एकूण सात दुचाकी मूळ मालकास परत केल्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन शेळके व आताचे विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.

त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे अँड.रोशन तायडे सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले यांनी नेहरू पार्क चौक स्थित कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलिसांचा सत्कार करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here