Home चंद्रपूर उमानदी घाट येथे २५ डिसेंबर रोजी बौध्द धम्म मेळावा

उमानदी घाट येथे २५ डिसेंबर रोजी बौध्द धम्म मेळावा

73

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.17डिसेंबर):-धम्मभूमी विकास सेवा समितीच्या वतीने दिनांक २५ डिसेंबर रोजी शिवणी रोड, रत्नापूर येथील धम्मभुमी येथे बौध्द धम्म मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. मेळावाचा प्रारंभ बौध्द विहार आंभोराचे भन्ते पचपन्ना बोधी तांबचिथक यांचे हस्ते ध्वजारोहणाने होणार आहे. यावेळी समता सैनिक दलाचे माध्यमातून मानवंदना देण्यात येईल.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे राहणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, राष्ट्रीय सचिव बि. एम. कांबळे, विदर्भ प्रमुख भिमराव फुसे, विदर्भ संघटक आनंद सायरे, जिल्हा उपाध्यक्ष विजया रामटेके यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

भोजनदानानंतर सायंकाळी ५ वाजता बौध्द भिम गितांवर आधारीत सांस्कृतीक कार्यक्रम व ग्रुप डॉन्स आयोजीत केला आहे. या मेळाव्याला सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here