Home बीड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

92

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.13डिसेंबर):-वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर तुकाराम रेंगे साहेब प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नेकनुर जि बीड येथे झाले बी कॉम व एम कॉम अनुक्रमे बलभीम महाविद्यालय व के एस के महाविद्यालय बीड येथे झाले.

त्यानंतर एम पी एस सी मार्फत पोलीस उप निरीक्षक या पदावर निवड झाली. पोलीस विभागात नागपूर पोलीस आयुक्तालय, महामार्ग वाहतूक मध्ये भंडारा व जळगाव येथे तसेच विशेष सुरक्षा शाखेमध्ये जळगाव येथे काम केले. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तालय, अँटी करपशन ब्यूरो, बीड, जातपडताळणी विभाग, औरंगाबाद, त्यानंतर जालना जिल्हा मध्ये पोलीस स्टेशन भोकरदन, बदनापूर, परतूर आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस स्टेशन कन्नड शहर, सिल्लोड शहर येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम केले आहे व सध्या स्थानीक गुन्हे शाखा येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. पोलीस विभागात काम करताना अनेक अडचणी प्रसंग येतात त्यामध्ये आम्ही कन्नड पोलिसांनी करोना काळात केलेले काम न विसरता येणारे आहे पोलीस दलात काम करत असताना एल एल बी ची पदवी प्राप्त केली.

सिल्लोड येथील व्यापाऱ्याला खंडणी मागण्याचे प्रकरणात अवघ्या पाच तासात आरोपी पकडला तसेच कन्नड शहर व सिल्लोड शहर येथील कार चोरी मधील कार परत मिळवून मालकांच्या स्वाधीन केल्या. औरंगाबाद येथील मंत्रालयातून सेवा निवृत्त अधिकारी यांना त्यांचे फार्म हाऊस वरून खंडणी साठी अपहरण केस मध्ये त्यांची सहा तासात त्याची सुटका करून आरोपी पकडले, तसेच गंगापूर येथे मुंडके कापून नग्न मृतदेह विहिरीत फेकलेल्या प्रकरणात आरोपींचा छडा पाच तासात लावून पकडले तसेच पाचोड येथे खून करून ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला त्यामधील मृतदेहाची ओळख पटवून रात्रीतून आरोपींना नागपूर व यवतमाळ येथून पडकले. तसेच बिदकिन येथील वयस्कर महिलेचा निर्गुण खून प्रकरण वैजापूर येथील पुजाऱ्याने खुन अशा अनेक खूनांचा उलघडा करून आरोपी पकडले आणि खुनाच्या गुन्हाच अनेक वर्षांपासून फरार आरोपीस कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले. सत्र न्यायालयात खुनाची शिक्षा झालेला आरोपी जेल मधून पॅरोल रजेवर आल्यावर शिक्षा चुकवण्यासाठी पाच वर्षांपासून फरार होता त्यास गुन्हे शाखेने शोधून काढून परत जेल मध्ये पाठवले.

त्याच बरोबर दरोडे, जबरी चोरी चे अनेक गुन्हे औंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये पेट्रोल पंप मॅनेजर ला लूट, देशी दारूच्या मॅनेजर ची लूट, प्रवाशांना आडवून लुटीची घटना,नोटा डबल करून देणारे अशा अनेक प्रकरणात औरंगाबाद ग्रामीण च्या गुन्हे शाखेने यश प्राप्त केले आहे. तसेच गंगापूर येथे पिस्टल व जिवंत राऊंड सह आरोपीस पकडले, चोऱ्या, घरफोडी, चैन स्नेचिंग, अश्लील फ्राड काँल, याबाबत पथनाट्या द्वारे ज्युनिअर चार्ली च्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली असून पोलीस विभागाची मान उंचावण्याचा मी माझे सहकाऱ्यांनी नेहमी प्रयत्न केला आहे व करत राहु. त्यासाठी मला माझ्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांची नेहमी साथ मिळत राहिली त्याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचा देखील याकामासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत लाभली त्यांचा देखील आभारी आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराने रामेश्वर रेंगें यांचे कौतुक होत आहे.

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here