Home चंद्रपूर नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – विवेक बोढे यांचे आवाहन

नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – विवेक बोढे यांचे आवाहन

174

🔸घुग्घुस न. प. ला प्रधानमंत्री आवास योजनेच्या २०० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

घुग्घुस(दि.13डिसेंबर):-नगर परिषदेला १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत एकुण २०० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे यात यात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मोफत भरून देण्यात येणाऱ्या १६८ लाभार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे भोंगा फिरविण्यात आला आहे तसेच लाभार्थ्यांना अर्ज भरून देण्यात असून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यात येत आहे व मार्गदर्शन करण्यात येत आहे. आणि घुग्घुस नगर परिषदेतर्फे ही भोंगा फिरविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या यादीची अंतिम मुदत १० डिसेंबर पर्यंत होती परंतु आता मुदत वाढ करण्यात आली असून ती ३० डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी प्रयत्न केले.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्य ५० हजाराच्या जवळपास आहे. घुग्घुस नगर परिषदेची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजना न.प.तर्फे राबविण्यात येत आहे

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here