Home पुणे कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो चे रविवार-१८ डिसेंबरला आयोजन

कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो चे रविवार-१८ डिसेंबरला आयोजन

148

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.13डिसेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच निर्मित “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो चे द बेस थिएटर ,रेस्काॅन कंपनी कंपाऊड बिल्डींग नं.३, SNDT काॅलेज समोर, कर्वे नगर, पुणे येथे रविवार दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी सांय ५ ते सांय ७ बहारदारपणे संपन्न होणार आहे.

यावेळी कवी वादळकार यांच्या प्रेम कवितांची अनोखी काव्यमैफल संपन्न होणार आहे.तरुण-तरुणींच्या मनावर आधिराज्य गाजविणा-या कवितांचा धूडगूस घालणा-या प्रेम कवितांची मैफलीमध्ये संपन्न होणार आहे.

हा थिएटर शो रसिकांसाठी विनामूल्य आहे.त्यासाठी फ्री पासेस मिळण्यासाठी संपर्क करावा.मर्यादीत जागा आहेत.सहभागी होणा-या रसिकांनी पुढील क्रमांकवर संपर्क-९६५७३४८६२२ साधून आपल्या फ्री पासेस घेऊन जाण्याचे आवाहान संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

कविता थिएटर आणुन तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठी या शो चे आयोजन केल्याची माहिती प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here