Home महाराष्ट्र पुसद येथे वंचित बहुजन आघाडीने केले जोडे मारो आंदोलन

पुसद येथे वंचित बहुजन आघाडीने केले जोडे मारो आंदोलन

192

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडी पुसदच्या वतीने तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्या नेतृत्वात चंद्रकांत पाटलाच्या वक्तव्याचा निषेध करत पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारुन निषेध करण्यात आला.

शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिक मागून शाळा सुरू केल्या.
अशा स्वरूपाचे वक्तव्य करत महापुरुषांचा अपमान केला.
मागील काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला.

त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी पुसदच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, डॉ. अरुण राऊत, विशाल डाके, प्रणव भागवत, नितीन सरोदे, प्रसाद खंदारे, शुभम खंदारे, राहुल धुळे, सिद्धार्थ बर्डे , विनायक शिरसाट , नागेश गायकवाड, अर्जुन उघडे, प्रवीण आमीड वार , शंतनू उबाळे, बाबजी करमणकर, प्रवीण गावंडे, मधुकर सोनवणे, अजय जाधव, निलेश शेंडे,नारायण हनवते, शंकर करमणकर, सिद्धार्थ वाहूळे, प्रीतम आळणे, गोपाल जगताप, विठ्ठल टाळीकोटे दिलीप ताळीकोटे ,मधुर खिल्लारे, आकाश धुळे, विपुल भवरे, प्रकाश भरकडे, बाळू लोंढे, महेश गोरे, सुनील डोंगरे, प्रशांत कांबळे इत्यादी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगू शकाल का हो, भारताच्या राजधानीचे नाव?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here