Home महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात चोपड्यात निषेधार्थ आंदोलन

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात चोपड्यात निषेधार्थ आंदोलन

144

✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चोपडा(दि.12डिसेंबर):-महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी यांनी नुकतेच पैठण येथील एका कार्यक्रमात भाषण करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात भीक मागून शाळा सुरू केल्या असे बेताल व्यक्तव्य केले.

त्यांच्या या वक्तव्याने महापुरुषांच्या अपमान होऊन जनतेच्या भावना दुखावल्या आहेत तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांना मंत्रीपदावरून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी महापुरुषांच्या जयघोषासोबतच चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमले चंद्रकांत पाटील यांच्यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

यावेळी माजी उपसभापती गोपाळराव सोनवणे, श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, फुल माळी समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष पुंडलिक माळी, शिवसेना शहर अध्यक्ष नरेश महाजन, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष समाधान माळी,दिपक महाजन, समाधान सपकाळे,सी बी माळी सर, प्रविण बाविस्कर,समाधान सोनवणे, सुनिल भालेराव,लखन बाविस्कर, अनिल वाडे, दिव्यांग सावंत, हितेंद्र माळी, प्रतिभा माळी आदी बहुजन समाज व फुले प्रेमी उपस्थित होते.

सांगू शकाल का हो, भारताच्या राजधानीचे नाव?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here