Home महाराष्ट्र गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या रा. से.यो शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी शिबीर...

गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या रा. से.यो शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

127

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.8 डिसेंबर):- गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय रासेयो शिबीर बिटरगाव (खुर्द) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 12 या दरम्यान रक्तगट,आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात 445 व्यक्तीची रक्तगट व आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात उमरखेड येथील वैदयकिय क्षेत्रातील डॉ.मंगेश नरवाडे, डॉ. विठ्ठल मस्के डॉ. दिपक माने, डॉ . स्वप्नील वानखेडे क्लिनिकल लॅबोरेटरी उमरखेड व औषधी विक्रेता संघटना यांनी औषधी वाटप करूनअथक परिश्रम घेऊन रासेयो शिबिरास सहकार्य केले.

या शिबिरात दुपारी 2 ते 5 दरम्यान बौद्धिक उद्बोधन कार्यक्रमात लेक वाचवा अभियान जनजागृती, महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उमरखेडचे तहसीलदार मा. आनंद देऊळगावकर साहेब, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद देशमुख, प्रा.नलिनी ठाकरे, प्रा. व्ही. बी. कनवाळे, प्रा. एस.पी. काळे, प्रा.डि.के.हरण उमरखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सविताताई कदम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री.चितांगराव कदम सर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान मोफत चष्मे वाटप प्रमुख वक्ते व पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन कु.सृष्टी शिंदे हिने तर प्रास्ताविक अनिल हनवते याने केले तर आभार समीर शेख या विद्यार्थ्याने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here