Home महाराष्ट्र १९७१ च्या युद्धातील सातारा जिल्ह्याच्या वीरांचा सन्मान

१९७१ च्या युद्धातील सातारा जिल्ह्याच्या वीरांचा सन्मान

162

🔸१५ मराठा माजी सैनिकांतर्फे “बुर्ज डे” साजरा

✒️सातारा-खटाव,प्रतिनिध(नितीन राजे)

सातारा(दि.9डिसेंबर):-भारतीय सैन्य दलातील १५ मराठा एल.आय माजी सैनिक संघटनेच्या वतीने “बुर्ज डे” साजरा करण्यात आला. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास १५ मराठा रेजिमेंट मधील महाराष्ट्रासह देशातील माजी सैनिक,सेवानिवृत्त अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये १५ मराठा रेजिमेंटच्या सैन्याने शत्रूंच्या सैन्यावर आक्रमकपणे चाल करून विजय मिळवला होता या ऐतिहासिक विजय दरवर्षी संघटनेच्या वतीने ” बुर्ज डे ” म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे निमित्त साधून भारत पाकिस्तान या १९७१ च्या युद्धामध्ये प्रत्यक्षात ज्या वीरांनी सहभाग घेतला अशा १५ मराठा रेजिमेंट मधील सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

या बुर्ज डे सन्मान व आभार सोहळ्याला सातारा जिल्ह्यातून अनेक वीरांनी आपली हजरी लावली होती.भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये बुर्ज बटालियनने पांडुरंग साळुंखे यांच्या अतुलनीय शौर्याच्या जोरावर विजय मिळवला होता. याच विजयाला ५१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या युद्धामध्ये सहभाग घेतलेल्या सातारा व खटाव तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला १५ मराठा रेजिमेंट मधील निवृत्त अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, ब्रिगेडियर ,कर्नल, सुभेदार कॅप्टन आणि जवान उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त ब्रिगेडियर अतुल गुप्ते यांनी संघटनेच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या तर ब्रिगेडियर विटेकर म्हणाले संघटनेच्या अशा कार्यक्रमात १५ रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी उपस्थित लावून संवाद वाढवावा यातून आनंदी आयुष्य जगण्यास मदत होते. आयुष्याच्या संध्याकाळ हा एकमेकांची सुखदुःख वाटण्याचा क्षण असून आपले आयुष्य समृद्ध व्हावे हाच या मेळाव्याचा उद्देश आहे.

निवृत्त ब्रिगेडियर एम. के.मेनन म्हणाले भारतीय आर्मीच्या इतिहासामध्ये १५ मराठा सैनिकांचा पराक्रम सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला आहे.पांडुरंग साळुंखे यांचे शौर्य आम्हाला आजही प्रेरणा देत आहे. माजी सैनिकांनी संघटित राहून एकमेकांना साथ देणे गरजेचे आहे असेही ब्रिगेडियर मेनन यांनी सांगितले.या कार्यक्रमाची प्रास्ताविका सुभेदार मेजर राजू पाडळे यांनी केली तर आभार सुभेदार मेजर विठ्ठल वडिंगेकर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी हनुमंत नलवडे,
राजेंद्र निपणे, सुभेदार रामचंद्र पवार ,अर्जुन देशमुख CHM, नारायण काशिद,गोरख चव्हाण ,मानसिंग गुजर,अंबादास सपकाळ ,शंकर साटे,प्रकाश जाधव,संजय घडावे,भिमराव फडतरे, शंकर फडतरे, सोपान गोडसे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपली उपस्थिती लावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here