Home महाराष्ट्र गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांना अभिवादन

गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांना अभिवादन

111

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.8डिसेंबर);-स्थानिक गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बी.आर. देशमुख तर अतिथी म्हणून प्रा.खिलारे, प्रा.डॉ. सानप,प्रा. डॉ. पखाले व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच साहेबांनी भारतीयांच्या कल्याणाकरिता केलेले विविध कार्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

तसेच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर गीत सादर केले.तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेबांमुळेच स्त्रियांना आदिवासींना ,मागासवर्गीयांना तसेच संपूर्ण भारतीयांना जगण्याचा व समतेचा अधिकार दिला ही जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी क्रांती होती असे मत प्रा. डॉ. महेंद्र पखाले ,कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनीआपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. सुधीर गोटे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राखी इंगळे यांनी पार पाडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,सहकारी कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here