Home महाराष्ट्र संविधानाबाबत जनजागृती काळाची गरज – प्रा. डॉ. दत्ता पवार

संविधानाबाबत जनजागृती काळाची गरज – प्रा. डॉ. दत्ता पवार

99

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.8डिसेंबर):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे संचालित अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा आसरपेंड येथे संविधान दिनाचे औचित्य साधून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. घरझारे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. डॉ. दत्ता पवार सर फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद यांनी भूषविले.सदर व्याख्यानमालेची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

मा. प्रा. डॉ. श्री. दत्ता पवार यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, हक्क व संविधनाप्रती आपली जबाबदारी आणि संविधान निर्मिती पावर सखोल मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती एस. एस. घरजारे यांनी स्वतंत्रय, समता आणि बंधुता या मुल्यांचे विश्लेषन करून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रज्ञा लडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.पी.पी. नाईक यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here