Home धार्मिक  श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी-श्रीहरी...

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी-श्रीहरी सातपुते यांचे शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन

106

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.7डिसेंबर):-महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ( शासन परीपत्रक क्र,ज,पू.ति, २२१८/प्र,क्र,१९५/२९ दि २६/१२/२०१८) कडे प्रशासकीय यंत्रणा करीत आहे डोळेझाक चिमुर श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने डिसेबर 2018 साली काढलेल्या पत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ( शासन परीपत्रक क्र,ज,पू.ति, २२१८/प्र,क्र,१९५/२९ दि २६/१२/२०१८) संदर्भानुसार श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेबर साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

त्याचे पालन व्हावे, त्यानुसार ८ डिसेंबर रोजी चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांनी केले आहे.

तसेच शासनाच्या आदेशा प्रमाणे शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी अधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा अशी विनंती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांनी केली आहे

बाबरी मस्जिद : महाध्वंस के तीस साल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here