Home चंद्रपूर ताडाळी स्थित ग्रेस कंपनी ला विस्तारीकरनाची परवानगी न देण्याची आप ची जिल्हाधिकाऱ्यां...

ताडाळी स्थित ग्रेस कंपनी ला विस्तारीकरनाची परवानगी न देण्याची आप ची जिल्हाधिकाऱ्यां कडे मागणी……

119

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.7डिसेंबर):-ताडाळी (एम आय डी सी) स्थित असलेल्या ग्रेस स्टील कंपनी द्वारा कंपनीचा विस्तारीकरनाचा प्रयत्न सुरू आहे परंतु याकरिता आम आदमी पार्टी घुग्घुस चा तीव्र निषेध आहे.याचे कारण असे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर द्वारा देण्यात आलेल्या प्रदूषणाच्या मर्यादा आधीच ओलांडलेल्या आहे. यामुळे संपूर्ण क्षेत्र प्रदूषित झालेले आहे यावर उपाय योजना म्हणून मागील तीन वर्षांपासून संबंधित विभागांकडून कुठल्याही ठोस प्रकारचे पाऊल उचलण्यात आलेले नाही जेणेकरून या क्षेत्रातील जन सामान्यांचा व पशू पक्षी यांचा जीवास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना जन सामान्यांना तोंड द्यावे लागत आहे. जर का संबंधित विभागांकडून कार्यवाही केली असती तर प्रदूषण नियंत्रित झालेले असते.

या बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना निवेदनातून मागणी करण्यात आली की या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी व संपूर्ण प्रदूषण आटोक्यात आणण्यात यावे. तो पर्यंत या कंपनी चे विस्तारीकरण थांबविण्यात यावे.

या समस्सेचे निराकरण झाले नाही तर यास संपूर्ण जबाबदार जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर हे राहतील व याचा निषेधार्थ आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र रोष आगामी काळात दर्शवण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धणविजय,महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबरी मस्जिद : महाध्वंस के तीस साल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here