Home महाराष्ट्र फौजदाराने सैनिकाला झोडपले!

फौजदाराने सैनिकाला झोडपले!

208

चोपडा येथील रिटायर मिलीटरी सैनिक पंकज पाटील यांना चोपडा चे फौजदार अवतारसींग चव्हाण यांनी फालतू कारणे मारहाण केली.रस्त्यावर मोटरसायकलचा अडथळा हेच मारहाणीचे निमीत्त .तरीपण मारले.हे राक्षसी कृत्य आहे.तरीही फौजदार वर काहीच कारवाई नाही.म्हणून पिडीत माजी सैनिक पंकज पाटील जळगाव कलेक्टर समोर उपोषण करीत आहेत.एकेकाळी सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाची ही अवस्था.तर सामान्य माणसाची हालत गृहमंत्री फडणवीस यांना माहिती असावी.पण ते सद्या शिवसेनेचा बदला घेण्यात व्यस्त आहेत.आमदारांचा गाढव बाजार किंवा गद्दार बाजार आटोपला असेल तर गृहमंत्री फडणवीस यांनी आता खात्यातील कामाकडे लक्ष द्यावे.आपला फौजदार नागरिकांचे रक्षण करतो कि हाणामारी?याकडे वळले पाहिजे.

हे सैनिक पंकज पाटील, सीमेवर शत्रू संगे लढतांना शाहिद झाले असते तर हेच फौजदार अवतारसींग सलामी ठोकायला पुढे झाले असते.आणि हेच पालकमंत्री गुलाबराव पाटील वीर चक्र चढवायला ठुमकत ठुमकत गेले असते.पण सैनिक जिवंत परत आले,हेच दुर्भाग्य!आणि ही अवहेलना! चोरांच्या गर्दीत रक्षकच भक्षक बनला.
जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संकटनमोचन मंत्री गिरीश महाजन पुर्ण वेळ निवडणूक लढण्यात व्यस्त आहेत.मंत्रीपद हातचे गेल्याशिवाय त्यांना फुरसत मिळणार नाही.मरेपर्यंत या डावपेचातून सुटका नाही.एक म्हणतो,त्याला मुलगा नाही.दुसरा म्हणतो,याचा मुलगा आत्महत्या करून मेला.आणि हे आता गाईम्हशीचे दुधाचे लोणी काढायला चालले.

गुलाबराव, महाजन,खडसे, पाटील,आटील आट्यापाट्या खेळण्यात दंग आहेत.किती हे सत्तेचे हापाळलेले?जसे कमवलेली दौलत मरतांना छाताडावर बांधून घेऊन जाणार आहेत.आमदार झाले.मंत्री झाले.नको तेथे बंगले,घरेदारे झालीत.अनेक ठिकाणी वस्ती वाढवली.तरीही भुकेलेच!बकासुराचे भूत अजून अंजनी नदीच्या खोऱ्यातच डवरते आहे कि काय?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव

भारताचा अनमोल हिऱ्यास विनम्र अभिवादन !…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here