Home Education पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना...

पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड

116

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.2डिसेंबर):- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत ‘तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार धरणगाव येथील पी.आर.प्राथमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना शामराव विसावे ( मोरे ) यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विचार करून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीयुत प्रा.भरत आ. शिरसाट आणि मंडळाच्या कार्यरत निवड समिती मार्फत शैक्षणिक वर्ष २०२२ करीता जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.

सदरील पुरस्कार वितरण सोहळा दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव येथे होणार आहे. त्यावेळी मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल – श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र बहाल केले जाणार आहे.

पी.आर.हायस्कूल संस्थेचे चेअरमन बापूसाहेब डॉ.श्री.अरूण कुलकर्णी, सचिव श्री डॉ.मिलिंद डहाळे आणि संचालक मंडळाने हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here