Home महाराष्ट्र 21 डिसेंबर च्या मोर्चा संदर्भात भंडारा येथे बैठक संपन्न

21 डिसेंबर च्या मोर्चा संदर्भात भंडारा येथे बैठक संपन्न

132

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.2डिसेंबर):- स्वतंत्र मजदूर युनियनतर्फे 21 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर आयोजित मोर्चा संदर्भात आज दि.1 डिसेंबर रोजी मा.एन.बी.जारोंडे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांचे अध्यक्षतेखाली भंडारा येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीत स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य संघटक मा.गणेश उके,मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रिय उपाध्यक्ष मा. सी. एस. जनबदकर, कास्ट्राईब चे मा.सुर्यभान हुमणे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन,स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटन व इतर शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचे शत्रु नेमके कोण?

आभार प्रदर्शन महेश मेश्राम यांनी केले. यावेळी भंडारा जिल्ह्य़ातून ज्यास्तीत ज्यास्त कर्मचारी व कंत्राटी कामगार मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रत्येक कार्यालयात जाऊन संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here