Home महाराष्ट्र सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी...

सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण

159

🔹महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार बहुजनांसाठी ऊर्जास्रोत !… – आमदार शिरीष चौधरी

✒️विषेश प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.2डिसेंबर):-पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नियोजित सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशन दुसरे याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघ यांना त्यांच्या खिरोदा निवासस्थानी दि.२ डिसेंबर २०२२ रोजी जाऊन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे व सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी शिरीष दादांना प्रत्यक्ष भेटून सन्मानपूर्वक आमंत्रित करून आमदारांच्या हस्ते पत्रिकेचे प्रकाशन केले.

याप्रसंगी प्रस्तावनेत स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जिल्हयातील सत्यशोधकी कार्यकर्त्यांचा उज्ज्वल इतिहास कथन केला तसेच संमेलनाचे आयोजित कार्यक्रम व कार्यवाहीची माहिती देऊन आजतागायत पूर्वतयारीचा तपशील त्यांना दिला. तसेच राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांनी संघाची उदिष्ट्ये,ध्येयधोरणे व सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक कृती कार्यक्रम अन्वये सांगोपांग चर्चा केली. मार्गदर्शन करतांना अधिवेशनाचे नियोजित उद्घाटक मा.आमदार शिरीष चौधरी म्हणाले की,” महात्मा ज्योतिरावांच्या समकालीन कार्यकर्त्यांचा उज्वल पूर्व इतिहास असला तरी वर्तमानकालीन समस्या निर्मूलन करण्यासाठी धारदार विधायक लढा दिल्याशिवाय चळवळीला उर्जितावस्था येणार नाही. कार्यकर्त्यांची प्रबोधनाची दिशा कशी असावी ? यासंदर्भात दादांनी सांगोपांग चर्चा केली. संमेलनासाठी आमदार शिरीष दादांनी यथाशक्ती आर्थिक सहकार्य केले.

याप्रसंगी जिल्हा आयोजन समिती सदस्य विजय लुल्हे, संजय वराडे,निवृत्त केंद्रप्रमुख रमेश सोनवणे,उद्योजक सुरेश सपकाळे तसेच कुऱ्हे पानाचे अधिवेशन कार्यकारी समिती उपसरपंच विलास रंदाळे ( उपसरपंच ) ग्रा पंचायत सदस्य किशोर पाटील मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रमोद उंबरकर यांनी केले.

रावणाला फक्त राम जाळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here