Home महाराष्ट्र कोरटेवा ॲग्री सायन्स तर्फे सावता माळी समाज मंदिर मोठा माळीवाडा येथे कृषी...

कोरटेवा ॲग्री सायन्स तर्फे सावता माळी समाज मंदिर मोठा माळीवाडा येथे कृषी मार्गदर्शन सोहळा !…

74

🔹रामधन परदेशी व मनोज माळी यांनी शेतकऱ्यांना केले कृषीविषयक मार्गदर्शन !….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.30नोव्हेंबर):- भारतातील थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कोरटेवा ॲग्री सायन्स तर्फे सावता माळी समाज मंदिर मोठा माळीवाडा येथे शेतकरी बांधवांना कंपनीचे अधिकारी रामधन परदेशी मॅनेजर जळगांव, मनोज माळी डेव्हलोपमेंट ऑफिसर यांनी मका पिकावर लष्करअळी नियंत्रण, भाजीपाला बुरशीजन्य रोग, खत व्यवस्थापन, तन नियंत्रण बियाणे व्यवस्थापन, आंतर व्यवस्थापन संदर्भात शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे माळी समाजाचे अध्यक्ष दादासो विठोबा नामदेव महाजन यांचा हस्ते रामधन परदेशी साहेब यांच्या सत्कार करण्यात आला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी दगडू नारायण महाजन, अशोक महाजन, रमेश दादा पैलवान, प्रवीण महाजन, नितेश भाऊ महाजन, नाना महाजन, महेंद्र महाजन, किशोर महाजन, श्रीराम महाजन, आप्पी महाजन, लीलाधर महाजन, बापू महाजन उपस्थित होते.सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. मनोज माळी यांनी सूत्रसंचलन व आभार मानले. कैलास भाऊ महाजन यांनी सहकार्य केले.

इण्डियाज फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स म्हणजे काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here