Home महाराष्ट्र सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार

सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार

89

✒️नगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नगर(दि.30नोव्हेंबर):-महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना माळीवाडा येथे महात्मा फुले समता पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

नगर शहराचे आमदार मा. संग्राम जगताप साहेब यांच्या शुभहस्ते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला पुरस्कारामध्ये सचिन गुलदगड यांना मानपत्र,शाल ,फेटा आदिंच्या स्वरुपात हा पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्रभूषण लोकनेते सचिनभाऊ गुलदगड यांनी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवा वर्गाला, कार्यकर्त्याना बळ देत गाव तेथे शाखा उभी करून त्याद्वारे रक्तदान शिबीर, नेत्रचिकीस्ता शिबीर, अंधत्व निवारण, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, स्वच्छता अभियान, शाळा, ग्रंथालयांना ग्रंथ-पुस्तकांचे वाटप, वकृत्व स्पर्धा आदी उपक्रम राबविले. वृक्ष क्रांती अभियान सुरु करून राज्यातील बहुसंख्य गावे दत्तक घेऊन वृक्ष चळवळ सुरु केली. लेक वाचवा- देश वाचवा हाक देत समाजात जनजागृती केली.

तसेच राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय सावता भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. युवा वर्गाला नोकरी विषयक मार्गदर्शन, जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने, आंदोलने, रॅली माध्यमाव्दारे सोडवणूक, खेड्याकडे चला – खेळाकडे चला हि हाक देत खेच फौंडेशन ची स्थापना आदर्श गाव हिवरे बाजार मधून केले, तरुणांना सामाजिक प्रवाहात आणून त्यांच्या नेतृत्व गुणांना चालना दिली.

११ मे महात्मा दिन प्रशाकीय पातळीवर साजरा व्हावा, संत सावता महाराजांचे जन्म गाव श्री क्षेत्र अरण ला तीर्थक्षेत्र “ अ ” वर्गाचा दर्जा मिळावा तसेच फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठ पुरावा करत आहेत. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामातरण घडून आणण्यात अग्रभागी असे समाजाची सामाजिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रात प्रगती घडून आणण्यासाठी सामाजिक व विधायक उपक्रम राबविणारे नेतृत्व म्हणजे माळी समाजाचे स्फुर्ती स्थान, तरुणांचे आशास्थान, मार्गदर्शक, वकृत्व, दातृत्व, कर्तृव्य त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व मा.श्री. सचिन गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

सदर कार्यक्रम प्रसंगी समितीचे अध्यक्ष माणिकराव विधाते सर,सचिव अशोकराव कानडे,पंडीतराव खरपुडे,श्री संत सावता माळी युवक संघाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जाधव,आमित खामकर,जालिंदर बोरुडे,दिपक खेडकर,किरण जावळे,सौ.रेणुका पुंड,बेबीताई गायकवाड,नितीन डागवाले,गणेश बोरुडे,प्रकाश भागानगरे,उध्दव शिंदे,आदि मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here