Home बीड राजपिंपरी येथे सप्ताहा कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राजपिंपरी येथे सप्ताहा कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

185

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:;9075913114

गेवराई(दि.29नोव्हेंबर):-तालुक्यातील राजपिंपरी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या नेतृत्वातून करण्यात आले होते. या सप्ताहातील जागराची कीर्तन हभप बोधले महाराज यांनी त्यांच्या अमृततुल्यवाणीतून कीर्तनाची सेवा दिली. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती दिलीप महाराज घुगे, तसेच सत्यनारायण महाराज लगड यांची लाभली होती.

जागराचे कीर्तन संपल्यानंतर गावातील वैद्यकीय क्षेत्रात पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेल्या कुमारी पूजा विकास पानखडे, पवन ढोकळे, सुरज सुनील पानखडे ,वैष्णवी विष्णू चव्हाण ,गीता कल्याण पानखडे यांचा बोधले महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जि प शाळेत शिकणारे इयत्ता आठवीचे दोन विद्यार्थी शितल कृष्णा पानखडे , तुकाराम माणिक पानखडे यांचा शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याबद्दल त्याचबरोबर चित्र रेखाटन कौशल्य पूर्ण करणाऱ्या इयत्ता दहावीचा विद्यार्थी पार्थ पांचाळ याने श्री संत सखाराम महाराज यांचे चित्र रेखाटन अतिशय सुंदर केल्याबद्दल त्याचाही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे विद्यार्थी

अस्मिता आसाराम पवार 92% , गौरी एकनाथ पानखडे 91% , प्राची बद्रीनाथ आरडे 90%

राजपिंपरी गावामध्ये आतापर्यंत
डॉ.राहुल दत्तात्रय इंदे MBBS, MD,
डॉ. बळीराम पंडित राठोड MBBS,
डॉ. सचिन बंडू चव्हाण MBBS,
डॉ सौरभ साईनाथ ठेंगरे BAMS ,
डॉ. अश्विनी विष्णू चव्हाण BAMS,
डॉ राजश्री अशोक पानखडे BHMS ,

इंजिनीयरमध्ये करिअर करणारे एकूण दहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून एकूण नऊ व्यक्ती कार्यरत आहेत. वकील म्हणून संभाजी रामकिसन पानखडे व अतुल भाऊसाहेब जोशी कार्यरत आहेत. पोलीस खात्यामध्ये एकूण पाच मुलांनी आपले आपले काम यशस्वीरित्या बजावत आहेत.

तलाठी म्हणून राजेश दत्तात्रय टकले, MSEBE मध्ये एकूण दोन ,
D. Farm, B.farm, M.farm पूर्ण करणारे एकूण पाच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.MBA एमबीएमध्ये शरद भागवत पानखडे ,
DMLT पूर्ण करणारे एकूण दोन विद्यार्थी आहेत.नर्सिगमध्ये एकूण तीन विद्यार्थी सक्सेस झाले आहेत. सहकारी कारखाना यामध्ये जवळपास सात व्यक्तींनी आपले नाव कमावले आहे. जय भवानी शिक्षण संस्थेमध्ये एकूण चार, मार्केट कमिटी गेवराई येथे सचिव म्हणून काम पाहणारे भाऊसाहेब माणिकराव बागल तसेच बस वाहक म्हणून बळीराम आप्पासाहेब यादव आणि गावातील मृदंग सम्राट सुमंत आत्माराम मत्रे, दत्ता बाबासाहेब पानखडे, नारायण रामराव मुळे, ओमकार नारायण इंदे.

अशा प्रकारे हा गुणवंताचा सत्कार कार्यक्रम ह भ प भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या कुशल मार्गदर्शनातून संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी राजपिंपरी गावालागत असलेल्या पंचक्रोशीतील शेकडो व्यक्ती उपस्थित होते. सर्वांनी या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. अशाच प्रकारची प्रेरणा सर्व मुला मुलींनी घ्यावी हा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम या ठ संपन्न करण्यात आला.हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी अटल महाविद्यालयाचे प्राध्यापक गणेश टकले( सूर्यवंशी) आणि प्राध्यापक अंकुश पांचाळ यांच्या संकल्पनातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here