Home Education विनोद पिसे चिमूर यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान

विनोद पिसे चिमूर यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान

581

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.29नोव्हेंबर):- 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे.

त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले श्री विनोद कृष्णराव पिसे मुख्याध्यापक श्री साईबाबा विद्यालय आमडी (बे) तथा सचिव चंद्रपूर जिल्हा मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांना सामाजिक बांधिलकी मानून शैक्षणिक उल्लेखनीय कार्य , विद्यार्थ्यां प्रती बांधिलकी, राज्यस्तरावर विज्ञानप्रदर्षणी मार्गदर्शन , विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुख्याध्यापकांना जिल्हास्तरावरील प्रशिक्षण , माध्यमिक विद्यार्थ्याना सुलभ गणित प्रयोगशाळा तयारकरून मार्गदर्शन ,सामाजिक उद्बोधन यात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार मुख्याध्यापक गटातून प्रदान करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदान संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने (वहिनीसाहेब), डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे या मान्यवरांच्या उपस्थितीत मा.विनोद पिसे यांना मुख्याद्यापक गटातून पुरस्कार प्रदान करण्यात आला, यात कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, पाच हजार रुपये किमतीची पुस्तके प्रदान करण्यात आली. या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभात संपूर्ण महाराष्ट्रातून ९०० नामांकन आले होते त्यात सर्वोत्कृष्ट ५० व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here