
✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.29नोव्हेंबर):-संविधान आम्ही भारतीय लोकांनी निर्माण केले त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.७४ वर्षापूर्वी आम्ही राज्यघटना स्वीकारली.या संविधानामध्ये सहजासहजी बदल करता येत नाही.बदल करावयाचा झाल्यास तीन पद्धतीनेच बदल करता येतो. आत्तापर्यंत या राज्यघटनेत 127 वेळा दुरुस्ती केली गेली. नव्याचा शोध घेत समाजाला अनुकूल कायद्याचा स्वीकार केला गेला. आज भारतीय मुलांना राज्यघटना म्हणजे काय? राज्यघटनेमध्ये काय काय नमूद केले आहे? राज्यघटना किती महत्त्वाची आहे? या सर्व गोष्टींची माहिती होणे गरजेचे आहे. म्हणून संविधान दिन साजरा केला जातो.
संविधानातील कलमं परिशिष्टे, संविधान समितीतील सदस्य त्यांचे कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार असे का म्हटले जाते? या सर्वांविषयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.एस.व्ही. जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एल.जी. जाधव म्हणाले की, भारतात भिन्न जाती,धर्म,पंथ,संस्कृती,परंपरेचे लोक राहतात या सर्वांना घटनेत समान दर्जा,समान संधी दिली आहे. सर्व लोकांनी एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहून संविधानाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला विकसित करा.
उद्याच्या विकसित भारताचे तुम्ही नागरिक आहात विकसित देशाची तुम्हीच धुरा वाहणार आहात. म्हणून स्वतःला संविधानाशी बांधून घ्या व देशाची प्रगती करा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री के.एस. महाले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पी.एस. सादिगले यांनी केले. श्री यु. एस.मस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य आर.ए.कांबळे, प्राध्यापक,प्राध्यापिका,विद्यार्थी, विद्यार्थिनी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ
