Home Education समाजाने कालबाह्य प्रथा टाळाव्यात – मुख्याध्यापक चटप

समाजाने कालबाह्य प्रथा टाळाव्यात – मुख्याध्यापक चटप

129

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

भोयगांव (दि. 28नोव्हेंबर):-स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलतांना व्यक्त केले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. चटप तर प्रमुख पाहुणे श्री. बी. झेड. निखाडे, श्री. डी. डी. ठाकरे, श्री. जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, कु. एस. एन. गाडगे, श्री. डी. टी. पानघाटे (वरिष्ठ लिपिक) श्री. व्ही. बी. वनकर, श्रीमती सुरेखा पिपळशेंडे उपस्थीत होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकपर मार्गदर्शन कु. व्ही. टी. वैद्य यांनी केले. याप्रसंगी कु. वैष्णवी राजेंद्र वरारकर, कु. श्रुतिका पारखी कू. वैष्णवी शंकर लोंढे कु. प्रतिक्षा बेरड कु. मानसी राजेंद्र वरारकर कु. नुपूर पिंपळशेंडे, आर्यन आत्राम, तुषार गोहणे, कु.नूतन चौधरी, कु. मानसी झोडे, कु.भूमिका मिलमिले या विद्यार्थ्यांनी व श्री. लांडे सर, श्री. निखाडे सर, श्री. ठाकरे सर, शिक्षिका कु. एस. एन. गाडगे इत्यादिनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्याची ओळख करून दिली. अशाप्रकारे महात्मा जोतिबा फुले यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही. टी. वैद्य तर आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here