Home महाराष्ट्र संत सद्गुरू वामनभाऊ महाराज आश्रमशाळा व मठ बांधकामास भक्तांनी हातभार लावावा –...

संत सद्गुरू वामनभाऊ महाराज आश्रमशाळा व मठ बांधकामास भक्तांनी हातभार लावावा – गहिनीनाथ गर्जे

131

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.24नोव्हेंबर):-श्रीक्षेत्र आळंदी येथे महान संत सद्गुरू वामनभाऊ महाराज आश्रमशाळा व मठ बांधकामाचा भुमिपुजन समारंभ मंगळवार दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते मोठया उत्साहात संपन्न झाला.

या बांधकामासाठी संत वामनभाऊंच्या भक्तगणांनी आपापल्या परीने हातभार लावून जी मदत देणे शक्य आहे ती गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचेकडे सुपूर्द करावी असे आवाहन गहिनीनाथ गडाचे सदस्य असलेले गहिनीनाथ महादेवबुवा गर्जे यांनी केले आहे. यावेळी संत सद्गुरू वामनभाऊंचे शेकडो भक्तगण उपस्थित होते. याप्रसंगी अनेक भक्तांनी मदतीचे आकडे जाहीर करून आपापल्या परीने सहकार्य केले आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

या भुमिपुजन समारंभ कार्यक्रमास हभप राम शास्त्री महाराज, मोहन महाराज, हरी महाराज, कैलास येवले, प्रितेश उर्फ ललित गर्जे , ज्ञानदेव खेडकर, विष्णू म.गिते, महेश नागरगोजे, शिवाजी आंधळे, बबन वनवे, विघ्ने सर, नामदेव सिरसाठ यांच्यासह टाळकरी, विणेकरी, मृदंगाचार्य तसेच हजारो भाविक – भक्त मंडळी उपस्थित होते.

गोवरचा विळखा वाढतोय….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here