Home Education पकाल्या आणि संघर्ष या ग्रंथाचे 28 ला प्रकाशन राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचेही वितरण

पकाल्या आणि संघर्ष या ग्रंथाचे 28 ला प्रकाशन राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचेही वितरण

117

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24नोव्हेंबर):-28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाचे औचित्य साधून निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक डॉ. खंडेराव शिंदे लिखित पकाल्या आणि ज्येष्ठ लेखिका शकुंतला शिंदे लिखित संघर्ष या दोन्ही आत्मकथनाचे प्रकाशन व राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदान संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार डॉ. निवेदिता माने (वहिनीसाहेब), डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती प्रकाशक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुदर्शन शिंदे (उस्मानाबाद), डॉ. सारिका केदार (परभणी), विभावरी मेश्राम (कल्याण), सुवर्णा सुतार, भरत चौगले, कुसुम राजमाने, शंकर पुजारी, समीर शेख, योगेश साबळे, सुनंदा बागे, पांडुरंग देशमुख, शरद पाडळकर, रेखा दीक्षित (कोल्हापूर), प्रा. डॉ. मिना सुर्वे, प्रा. डॉ. श्रीधर शिंदे, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, डॉ. सूरज चौगुले, डॉ. भरत जाधव, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. अर्जुन पन्हाळे, अस्मिता पवार, शिवाजी माळी (सांगली), डॉ. किरण जगदाळे, डॉ. दत्तात्रय काळेल, डॉ. जितेंद्र जळकुटे, सविता सुकाळे (सोलापूर), छाया पाटील, डॉ. राजेन्द्र ननावरे (मुंबई), डॉ. राजेंद्र गायकवाड (पुणे), डॉ. सागर सानप, संभू कोकाटे (ठाणे), प्रा. माधव आग्री (पालघर), प्राचार्य डॉ. सुरेश कुराडे (सिंधुदुर्ग), सोपान भोईर, संजय पवार, महेंद्र पगारे, बाळूकाका शेवाळे (नाशिक), डॉ. आत्माराम झिंजर्डे, डॉ. हरिदास विधाते (बीड), प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (बेळगाव), डॉ. संजय वाघंबर (लातूर), विठ्ठल गोंडे, भास्कर बावनकर (चंद्रपूर), क्रांती भोसले (रायगड), के. एस. शिंदे, आराधना गुरव (सातारा), शंकर अंदानी, सुनंदा दहातोंडे (अहमदनगर), प्रा. अनिल भुरके दर्यापूर (आमरावती), प्रा. डॉ. गोकुळ बोरसे (जळगाव), बाबासाहेब कांबळे (रत्नागिरी) या 51 मान्यवरांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके देऊन यावेळी प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच यांच्या वतीने राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सिद्धार्थ कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, यांनी केले आहे.

गोवरचा विळखा वाढतोय….

पत्रकार परिषदेला लेखक डॉ. खंडेराव शिंदे, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. कपिल राजहंस, प्रा. मिनल राजहंस, चंद्रकांत सावंत, निरंजन शिंदे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, शेषराव नेवारे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. पद्माकर तामगाडगे, सुरेश केसरकर, मोहन मिणचेकर, आचार्य अमित मेधावी, रंजना सानप, उद्धव पाटील, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. अविनाश वर्धन उपस्थित होते.

https://www.purogamisandesh.in/news/62282

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here