Home महाराष्ट्र वीज वितरण महामंडळाने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये: अतुल खूपसे पाटील

वीज वितरण महामंडळाने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये: अतुल खूपसे पाटील

73

🔸लाईट सुरु करा म्हणून आमच्याकडे जी.आर आला नाही: महावितरण

✒️विशेष प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.23 नोव्हेंबर):-शेतीपंपाची लाईट सुरळीत करावी म्हणून जनशक्ती संघटनेकडून वीज वितरण महामंडळ, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन करमाळा,यांना देण्यात आले असुन, ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आधीच हैराण असताना वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांवर पुन्हा नाहक सुरू केला आहे .कंपनीने चालू केलेल्या वीज तोडीच्या मोहिमे विरोधात जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील आंदोलन करणार.

सरकारकडून आम्हाला वीज बिल वसुलीसाठी शेतकरी लाईट बिल भरत नाही त्यांची लाईट कट करा असे आदेश आले होते .त्याप्रमाणे आमच्याकडे लाईट सुरळीत करावी म्हणून शासनाकडून कुठलाही जी.आर प्राप्त झालेला नाहीत. जोपर्यंत आमच्याकडे जी.आर प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही शेतीपंपाची लाईट सुरळीत करणार नाही.असे अधिकार्यानी यांनी सांगितले आहे.

राज्याचे उपमुख्मंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी तोंडी वीज कट करू नका सांगितले असेल तरी महावितरण कडून वीज तोडणी सुरूच आहे.आणि अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता ते म्हणत आहेत की आत्तापर्यंत आमच्यापर्यंत कोणताही लेखी जी आर प्राप्त झालेला नाही.हे म्हणजे एक प्रकारे शासनाकडून ही आणि महावितरण कडून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे….. . . .

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

चालू असलेली वीज तोडणीची मोहीम जर महावितरण कंपनीकडून थांबली नाही किंवा शासनाने तशा प्रकारे सूचना महावितरण ला दिल्या नाहीत तर याचे परिणाम शासन आणि महावितरण दोघंही भोगणार आहेतच.आम्ही संघटनेकडून महावितरण आणि शासनाला येत्या ३० नोव्हेंबर पर्यंतचा अवधी दिला आहे जर ३० तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे वीज तोडणी थांबली नाही किंवा तोडलेला वीजपुरवठा सुरळीत केला नाही. तर जनशक्ती संघटनेच्या वतीने १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे. . .

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यामधे गणेश वायभासे, अतुल राऊत,शरद एकाड,बालाजी तरंगे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे ,अजीज सय्यद,साहेबराव इतकर,बालाजी तरंगे,अक्षय देवडकर,कल्याण गवळी ,नवनाथ ढेरे,कैलास ढेरे,नयन मस्के,अक्षय मस्के,चंदू डोलारे,ऋषी जगदाळे ,राणा वाघमारे उपस्थित होते

गोवरचा विळखा वाढतोय….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here