Home चंद्रपूर माणिक मुन यांना डॉ. आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार प्रदान

माणिक मुन यांना डॉ. आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार प्रदान

213

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24नोव्हेंबर):- राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात येणारा दिवंगत नारायणराव गेडकर स्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार प्रसार पुरस्कार यावर्षी माणिकराव मुन टाकळी (चना) ता. देवळी जि. वर्धा यांना केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीकांत धोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री. मुन काही महत्त्वाच्या कामामुळे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन घाटकुळ ( ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर) येथे येऊ शकले नव्हते, त्यामुळे प्रस्तुत पुरस्कार त्यांच्या गावी जाऊन देण्यात आला.

मुन हे सामाजिक कार्यकर्ते असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांचेवर आहे. पुरस्काराबद्दल श्री. मुन यांचे परिषदेचे मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कार्यकारीणी सदस्य नामदेवराव गेडकर, नारायणराव सहारे, माजी पोलीस निरीक्षक यवनाश्व गेडकर , टाकळी चना चे सरपंच किशोर पाटील इंगोले, परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेणेकर, डॉ. श्रावण बाणासुरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद देशमुख, अरूण झगडकर, रामकृष्ण चनकापूरे आदींनी अभिनंदन केले आहे.

गोवरचा विळखा वाढतोय….

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here