Home महाराष्ट्र पंधराव्या वित्त आयोगाची कागदोपत्री कामे दाखवुन बील उचल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी कडे...

पंधराव्या वित्त आयोगाची कागदोपत्री कामे दाखवुन बील उचल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी कडे तक्रार

250

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23नोव्हेंबर):-तालुक्यातील मौजे पोखर्णी (वा) येथील पंधराव्या वित्त आयोगाची स्वनिधीतील कामे , मनरेगाचे कामे , आपले सरकार सेवा केंद्र मानधन , आपले सरकार सेवा केंद्र , पेव्हल ब्लॉक , नाली बांधकाम , अंगणवाडी दुरूस्ती , साहित्य खरेदी , पाईपलाईन व टाकी दुरूस्ती बंधीस्त नाली , सार्वजनिक मुतारी या हेडखाली सरपंच , ग्रामसेवक यांनी कामे केली असल्याचे दाखवून लाखो रूपयाची बिले उचलले आहेत . प्रत्यक्षात मात्र मौजे पोखर्णी(वा) येथे एकही काम झालेले नसतानाही या कामाचे बिल उचलले आहे .

पंधराव्या वित्त आयोगाची बोगस कामे दाखवून बिल उचलले असुन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य कार्यवाही करणे यावी तसेच या झालेल्या बोगस कामाची चौकशी करून येथील ग्रामसेवक , सरपंच यांच्याकडून घेतलेले बिले वसुल करून संबंधीत ग्रामसेवक , सरपंचासहीत ,व संबधीत अधिकारी , कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शाम पंडीत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here