Home महाराष्ट्र दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे पोपट गवारी उमेदवारी अर्ज भरणार

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे पोपट गवारी उमेदवारी अर्ज भरणार

178

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(विजय केदारे)

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत युवा पत्रकार पोपट (पंकज) गवारी हे अर्ज दाखल असून, त्यांना उमेदवारी करावी म्हणून मतदारांनी आग्रह केला आहे.

निळवंडी ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत असून, या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी सर्वच गट सरसावले आहे. निळवंडी ग्रामपंचायत चे वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका लागणार आहेत. त्याच्याही परिणाम या निवडणुकीवर दिसून येणार आहे. त्यामुळेच प्रत्येक नेता निळवंडी गावच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे.

या निवडणुकीत निळवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार पोपट (पंकज) गवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी आग्रही मागणी मतदारांनी केली आहे. पंकज गवारी यांनी अद्याप उमेदवारिस होकार दिला नाही. परंतु पोपट गवारी यांच्याकडे कामाचा प्रचंड अनुभव असून तालुक्यात व उमराळे बुद्रुक गटात जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा निळवंडी गावाला होऊ शकतो. म्हणून पोपट (पंकज) गवारी यांनी उमेदवारी करावी असा मतदारांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर पोपट (पंकज) गवारी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे सूचक विधान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here