Home चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात तेरा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात तेरा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

154

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18नोव्हेंबर):-रक्तदान हेचं जीवनदान हे ब्रीद मानून सलग १८ व्या वर्षी घुग्घुस येथील गांधी चौकात सोमवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, इंदिरा नगर, वरोरा, भद्रावती, बीबी, कोरपना, राजुरा, चंदनखेडा, जिवती, गोंडपिपरी, तोहगाव, चिंतलढाबा याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी १७५३ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून विक्रम केला होता. मागील १७ वर्षांपासून घुग्घुसमध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे.

घुग्गुस येथील शिबिरातून ४०० बॅग रक्तपुरवठा दंगलग्रस्त अमरावती शहराला पाठवण्यात आल्या होत्या. या वर्षी नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली व अहेरी येथील शासकीय रक्तपेढीला रक्तपुरवठा करण्यात येणार आहे.रक्तदान शिबिराला मोठया संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे व रक्तदान करून देशसेवा करावी असे आवाहन आयोजक देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here