Home महाराष्ट्र पथदर्शी धम्मक्रांती काव्य संग्रहाचे प्रकाशन

पथदर्शी धम्मक्रांती काव्य संग्रहाचे प्रकाशन

521

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.18नोव्हेंबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र (रत्नागिरी) तथा नागपूर, चंद्रपूर यांच्या विद्यमानाने द्वितीय वर्धापन दिन आणि राजस्तरीय कविसंमेलन सोहळा उरुवीला वर्धा रोड नागपूर येथे संस्थेचे संस्थापक मनोज जाधव यांच्या हस्ते अर्चना उके चव्हाण लिखित पथदर्शी धम्मक्रांती काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. खरं तर अविस्मरणीय क्षण म्हणजे एकाच वेळी या कार्यक्रमात 14 कविंच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

यावेळी या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाध्यक्ष अधिक कोकण विभागीय अध्यक्ष व लोपविंग ग्रुप,बिल्डर अँड डेव्हलपर, कायदेशीर सल्लगार विनोदजी जाधव (मुंबई) तसेच संस्थेचे संस्थापक मनोज जाधव (रत्नागिरी) उपस्थिती होते. त्याचबरोबर स्वागताध्यक्षा भावना खोब्रागडे मॅडम (चंद्रपूर )आणि कविसंमेलनाध्यक्ष शालिक जिल्हेकर- जेष्ठ साहित्यिक, नाटककार (नागपूर) व विचार मंच्यावर उपस्थिती असलेले सर्व मान्यवर तसेच नागपूर अध्यक्ष जगदीश राऊत, नागपूर सचिव अर्चना चव्हाण, ठाणे उपाध्यक्षा माला मेश्राम, प्रा.नानांजी रामटेके या सर्वांच्या उपस्थितीत हा आनंद सोहळा संपन्न झाला.
अर्चना उके चव्हाण आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, कविता तुझ्याशी माझी मैत्री झाली ना तेव्हा माझे आयुष्य शुन्यात होते. शुन्यात जीवन जगतांना वाट्याला शुन्यच येतात.

त्या पुढे किती आकडे जोडावीत हे स्वतः वर अवलंबून असते. त्यातून स्वअस्तित्वाची निर्मिती होते. प्रत्येकाला एक धेय्य असले पाहिजे. हे धेय्य मी कविता तुझ्या मुळे गाठले. त्यातून उत्कर्ष हा नक्कीच….आणि खरंच तू माझ्या आयुष्यातील शुन्याला अनेक आकडे लावले. तू भेटण्यापूर्वी. कोरोना काळात मला मा.पुष्पाताई बोरकर मैत्रीण म्हणून लाभल्या. त्या एक उत्तम साहित्यिक आहेत. त्यांच्यामुळे मला तुझा छंद जडला व मी त्यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन तुझे रूप न्याहाळू लागले. अनेक रुपात तू मला भेटत गेली व मी कालांतराने तुला शब्दांत गुंफून आकार देऊ लागले. ताईंचे क्षणोक्षणी मार्गदर्शन मिळू लागले.

तुझ्या सानिध्यात मी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मानवी मनात पेरू लागली. कदाचित तुला माहित असेल माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा प्रगल्भ व संवेदनशील असतो. तुला शब्द सुतात गुंफणे म्हणजे भावनांची शब्दमय सांगड घालणे. या पलीकडच्या शब्दांचा अनुभव म्हणजे तू. माझ्या लेखणीतून तुला साकारण्याची प्रेरणाही मला ताईंमुळे मिळाली.

माझी साहित्यिक सखी भावनाने ही तुझ्या बद्दल भावना व्यक्त केल्या तेव्हा मी तुला क्रमवारी मांडत गेली व ८५ पानांच्या एका संग्रहात संग्रहीत करून “पथदर्शी धम्मक्रांती” असे तुझे नामकरण केले. तुझ्या सौंदर्यात भर घालण्याचे काम माझी धम्मसखी ज्योत्स्ना मोरे यांनी केली. तुझ्या उदयाच्या शुभेच्छा माझ्या लेकींनी, माझ्या सख्यांनी, माझ्या जीवलगांनी आप्तेष्टांनी दिल्या. परंतू एक वेदनेची बाब म्हणजे ज्यांच्या मुळे तुझा उदय झाला त्या माझ्या जीवलग ताई तुला भेटण्यासाठी काही कारणास्तव येऊ शकल्या नाही, ही खंत माझ्या मनात नेहमी घर करून राहील.ही कधी न भरुन निघणारी दरी.पण एक लक्षात घे ताई मुळे आपल्याला स्वअस्तित्व मिळाले,म्हणून अर्चना उके चव्हाण मला त्यांच्या ऋणात रहायला आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here