Home यवतमाळ रेल्वे प्रकल्पबाधितांचा महसूल मंत्र्यांना निवेदन

रेल्वे प्रकल्पबाधितांचा महसूल मंत्र्यांना निवेदन

80

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 6 ऑगस्ट)
तालुक्यातील प्रस्तावित वर्धा – नांदेड रेल्वे प्रकल्पबाधित्यांच्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर महसूल मंत्री विखे पाटील यांना उमरखेड तालुका शेतकरी संघर्ष समितीने विविध मागण्यासह निवेदन दिले अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बिजोरे पाटील यांनी दिली.

या मोर्चामध्ये प्रकल्प बाधित सोळा गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत.
या मोर्चाचे आयोजन उमरखेड येथून सुरुवात करण्यात आली होती.

यावेळी उत्तमराव जाधव उपाध्यक्ष सचिव केशव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती.

तालुक्यातील वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पात तालुक्यातील सोळा गावांचे बागायती शेती संपादित करण्यात आली आहे त्यामुळे सहाशे ते सातशे शेतकऱ्यांचे मुख्य साधन शेतीवर अवलंबून असताना वंचित झालेले आहे.

या प्रकल्पात मारलेगाव ,चिंचोली संगम, बिटरगाव उमरखेड, मरसूळ ,दहागाव, बेलखेड, कुपटी ,पळशी नागापूर, दिवटपिंपरी, तरोडा, मुळावा ,कळमुला या गावातून शेकडो हेक्टर बागायती शेतजमीन रेल्वे प्रकल्प निर्माण कार्यासाठी शासनाने भूमी अधिग्रहण केले आहेत.

शेतकऱ्यांचे शेत जमीन रेल्वे प्रकल्पात गेल्यामुळे त्यांचा जीवन निर्वाह सर्व गोष्टी शेतावर आधारित आहेत एकीकडे शासनाने शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मोबदला दिला त्यामुळे शेती व्यवसाय शेतकऱ्यांना जीवन निर्वाहासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने शेतकऱ्यांना रेल्वे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन तसेच त्यांच्या अपत्याला शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य देऊन सहकार्य करावे अशा विविध मागण्यासह तालुक्यातील शेकडो रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबई येथे विधानभवनावर धडकले यावेळी मुंबई येथे बेलखेड येथील भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी रेल्वे ग्रस्त बाधितांना भेटून रेल्वे प्रकल्पाच्या कार्यासाठी तालुक्याती 16 गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिग्रहण केल्या मात्र इतर प्रकल्पांच्या तुलनेत या शेतकऱ्यांना शासनाने तुटपुंजा मोबदला दिला आहे. त्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शासनाने पाच पट भरीव आर्थिक मोबदला द्यावा, शासनाच्या नियमा प्रमाणे प्रकल्प बाधितांच्या सर्व सवलती द्याव्या.
त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे.

चौकट:- या रास्त मागण्यांसाठी शेतकरी लढा देत आहेत या लढाईत मी प्रकल्पग्रस्तांसोबत आहे – विखे पाटील (महसूल मंत्री)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here