




🔸नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांची मानले आभार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपूरी(दि. 6 ऑगस्ट):-ब्रह्मपुरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती प्रा.रामलाल महादेव दोनाडकर बरडकिन्ही यांची निवड झालेली असून सदस्यपदी विलास सांगोळकर पेठवार्ड ब्रह्मपुरी,सौ.कविता धर्मपाल राहाटे रा. निलज, वामन दयाराम मैंद रानबोथली, विलास सदाशिव वाकुडकर आक्सापुर,पवन विजय जयस्वाल शेष नगर ब्रह्मपुरी, मारोती रामाजी ठेंगरी चिखलगाव, विनायक विश्वनाथ पाकमोडे मेंडकी,स्वप्नील शशिकांत अलगदेवे भवानी वार्ड ब्रह्मपुरी, राजेश्वर नारायण मगरे गोगाव इ.यांची निवड महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या शिफारशीनुसार झालेली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मा.नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे आभार मानले आहेत.
ब्रह्मपुरी भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजि.अरविंद नंदुरकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, तालुका भाजपा महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे,तालुका भाजपा महामंत्री नामदेव लांजेवार, उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर तथा शहर महामंत्री मनोज भूपाल, भाजपा शहर माजी महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर इत्यादींचे आभार मानले आहेत.येत्या काळात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची कामे प्रामाणिकपणे आणि प्राधान्य क्रमाने करण्यात येईल असे नवनियुक्त अध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर यांनी म्हटले आहे.

