Home Breaking News मोर्शी वरूड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार विधिमंडळात आक्रमक !

मोर्शी वरूड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार विधिमंडळात आक्रमक !

75

🔸अपूर्ण सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याची मागणी !

🔹मोर्शी वरूड तालुक्यातील मंजूर विकास कमावरील स्थगिती उठविण्याची केली मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.17मार्च):-विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी विधीमंडळात ड्राय झोन मोर्शी वरूड तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नावर सभागृहात जोरदार बाजू मांडून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी पक्ष राजकारण बाजूला ठेवून रद्द केलेल्या कामांना मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी केली. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या पंढरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता अजितदादा पवार यांनी करून दिली. त्यानंतर ६ महिन्यामध्ये त्याच्या DPR शासनाकडे सादर करून त्याला प्रशासकीय मान्यता दिली परंतु ज्या कंपनीला ते काम दिले त्या कंपनीने स्पिल गेट, फिडर कॅनल बंदिस्त वितरण प्रणालीचे काम अद्याप पूर्ण केले नाही जून २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे असताना सुद्धा प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये थांबलेले आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून पंढरी सिंचन प्रकल्पाचे संपूर्ण काम तत्काळ पुर्ण करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

मोर्शी तालुक्यातील निम्न चारघड प्रकल्पाला २००९ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली असून १५० कोटी रुपये खर्च करून सुद्धा काम विहीत कालावधीत पूर्ण झाले नाही.

मजुरी, इंधनामध्ये दरवाढ झाल्यामुळे कामाचे किंमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. चारगड प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या खोपडा बोंडणा यासह इतर गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करून चारगड सिंचन प्रकल्पाच्या कामाच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.१९८० मध्ये अप्पर वर्धा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती बाधित झाली गाव विस्तापित झाले त्या सर्व गावांमध्ये मूलभूत सेवा सुविधा निर्माण करा. २ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेला शेकदारी सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त वितरण प्रणालीचे काम कार्यान्वित करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

मोर्शी वरूड तालुका अतिशोषित असल्यामुळे सिंचनाच्या जास्तीत जास्त प्रकल्प असणे अत्यंत आवश्यक आहे. महविकास आघाडी सरकारने वैनगंगा पैनगंगा प्रकल्प अस्तित्वात आणला त्याला शासनाने मंजुरी दिली असून ज्या हेतूसाठी वैनगंगा पैनगंगा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे तो उद्देश साकार करण्यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील १६५ अतिशोशित गावे या प्रकल्पामध्ये सहभागी करून नदीजोड प्रकल्पाचा माध्यमातून पाक प्रकल्प, पंढरी प्रकल्प, शेकदरी प्रकल्पामध्ये पाणी टाकून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी केली.

मोर्शी विधानसभा मतदार संघ अतिशोषीत असल्यामुळे १०० कोटी रुपये किमतीचे कोल्हापुरी बंधारे व इतर प्रकल्पास शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या होत्या परंतु सदर कामांवर स्थगीती देण्यात आलेली आहे. सदर स्थगीती उठविण्याची कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.अमरावती जिल्ह्यात जुलै-२०२२ ते ऑक्टोबर २०२२ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-याच्या जमीनी खरडल्या आहेत. ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील रस्ते, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे व पुर संरक्षण भिती वाहून गेल्या आहेत. नुकसान झालेले रस्ते, तसेच ग्रामीण भागातील घरांची पडझड व शेतक-यांच्या जमीनी खरडून गेल्या आहेत यावर तत्काळ उपाय योजना करून निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अप्पर वर्धा धरणांमधून अमरावती शहरासह इतर गावांना पाणी पुरवठा करण्यात असून त्या अप्पर वर्ष धरणाच्या पाण्यामध्ये मोर्शी शहरातील सांडपाणी जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नळा धरणाच्या बाजूला त्या फिल्टर प्लांट निर्माण करून मोर्शी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नळा व दमयंती नदीला पुरसंरक्षक भित तयार करण्याची मागणी करून वरूड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी रेटून धरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here