Home लेख मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी!

मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी! [त्र्यंबक बापूजी ठोंबरे पुण्यस्मरण विशेष.]

77

 

_बालकवींच्या शिक्षणात खंड पडत होता. निसर्गतःच त्यांनी आपले शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या सानिध्यात येऊन काव्याचे वाचन केले. त्यांच्या बहिणीमुळेच त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. त्यांनी नाशिकला संस्कृत तर पुण्यात इंग्रजीचे अध्ययन घेतले. त्यांच्याविषयी श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी रोचक संकलित माहिती देताहेत… संपादक._

“श्रावण मासी हर्ष मानसी।
हिरवळ दाटे चोहीकडे।।
क्षणात येते सरसर शिरवे।
क्षणात फिरुनी उन पडे।।”
बालकवींच्या प्रसिद्ध कविता- आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी, श्रावणमास या आहेत, तर त्यांची काही पुस्तके- • फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता, • बालकवींच्या निवडक कविता, • बालकवींच्या बालकथा (आत्मकथन), • बालकवींच्या बालकविता, • बालविहग कवितासंग्रह, • समग्र बालकवी ही आहेत. ही कविता अभ्यासा-
“हिरवे हिरवेगार गालिचे|
हरित तृणाच्या मखमालिचे||
त्या सुंदर मखमालीवरती|
फुलराणी ही खेळत होती||”
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. यांचा जन्म महाराष्ट्राच्या धरणगाव येथे दि.१३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई होते. त्यांचे वडील बापूराव हे पोलीस खात्यात असल्याने वारंवार त्यांच्या बदल्या होत होत्या. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात खंड पडत होता. निसर्गतःच त्यांनी आपले शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या सानिध्यात येऊन काव्याचे वाचन केले. त्यांच्या बहिणीमुळेच त्यांच्यात कवितेचे आवड निर्माण झाली. त्यांनी नाशिकला संस्कृत तर पुण्यात इंग्रजीचे अध्ययन घेतले. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती विकट झाली. थोरल्या आणि धाकट्या भावाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. त्यांचे लग्न विनायक जोशी यांची कन्या पार्वतीबाईशी झाले. पण त्यांना कौटुंबिक सुख मिळाले नाही. त्यांचे त्यांच्या पत्नीशी जुळले नाही आणि त्यांचे वैवाहिक जीवन अयशस्वी झाले. त्यांनी आपल्या पोटासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. एक काव्य-
“कोठुनि येते मला कळेना|
उदासिनता ही हृदयाला ||
काय बोचते ते समजेना|
हृदयाच्या अंतर्हृदयाला||”
मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक या बालकवींना मुलगा मनात असत. त्यांचे मातृत्वाचे संबंध होते. बालकवी टायफॉईडने आजारी असताना रेव्ह.टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी अवघे चाळीसही दिवस त्यांची काळजी घेतली. जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. या कविसंमेलनाने बालकवी साहित्यरसिकांना ज्ञात झाले.
“आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे.
वरती खाली मोद भरे,
वायू संगे मोद फिरे.”
त्यांना निसर्गाची ओढ बालपणापासूनच होती. या वयातच त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उपाख्य रामचंद्र कृष्ण वैद्य यांचा सहवास लाभला. तर पुण्याच्या वास्तव्यात गोविंदाग्रज, दिवाकर यांचा सहवास लाभला. वनवासींसह बालकवींनी निसर्गाच्या विविध छटा अनुभवल्या. त्यांनी वनवासींच्या कीर्तनासाठी काव्य रचना केली. कमी वयातच वनवासींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना घरी परतावे लागले! निसर्गाच्या सहवासात बालकवींनी जीवनाचे अनेक रंग अनुभवले. या निसर्गातच बालकवी रमले. निसर्गाची मधुर गाणी बालकवी यांनी रचली. निसर्गविषयक कवितांशी बालकवींच्या जीवनाचा साक्षात संबंध आहे. म्हणूनच त्या भावोत्कट, या अनुषंगाने हृदयस्पर्शी उतरल्या आहेत. बालकवींनी प्रकृतीच्या पर्यवेक्षणात रात्रीमागून रात्र आणि दिवसामागून दिवस घालवले होते. त्यांचे निधन जळगावला असताना दि.५ मे १९९८ रोजी झाले. त्यास समर्पक कविता-
“झांकळुनी जळ गोड !
काळिमा पसरी लाटांवर!!
पाय टाकुनी जळांत बसला!
असला औदुंबर!!”
!! स्मृतिदिनी बालकवींना अनेक विनम्र अभिवादन !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
पोटेगावरोड, गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here