Home महाराष्ट्र मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून देणे, हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली – आ....

मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून देणे, हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली – आ. देवेंद्र भुयार आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन !

21

 

वरूड तालुका प्रतिनिधी :-
मोर्शी वरूड तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चौकाचौकात करण्यात येणारे अभिवादन, हातामध्ये निळा झेंडा घेऊन ‘जय भीम’चा नारा देत शहरासह विवीध गावांमधून फिरणारे बाइकस्वार, ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या आंबेडकर यांच्या प्रतिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत केली जाणारी प्रार्थना, भीमगीते ऐकण्यासाठी झालेली गर्दी, अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मोर्शी वरूड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे. केवळ जयंती, महापरिनिर्वाण दिन असे कार्यक्रम करून आपली जबाबदारी संपत नाही, तर बाबासाहेबांचे कार्य त्यांचे आदर्श, प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल, तरच त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला दिशा देता देईल, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. १४ एप्रिल रोजी मोर्शी वरूड तालुक्यात विवीध ठिकाणी आमदार देवेंद्र भुयार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
जगभरातील देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्य घटनेचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करतात. जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे. मात्र भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे. केवळ आपल्या देशावरच नाही तर त्यांचे ,जगावर उपकार आहेत असे मत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध संस्थांच्या वतीने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागामध्ये विवीध गावांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here