Home लेख !! सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! (अक्कलकोट स्वामी...

!! सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! (अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन सप्ताह.)

26

 

_”सबसे बडा गुरू… गुरूसे बडा गुरू का ध्यास… और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज…!” तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…!” अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते. सदर ज्ञानवर्धक संकलित माहिती श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांत वाचा… संपादक._

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे आपल्या २२ वर्षांचे आयुष्य जगले, ते इसवी सनाच्या १९व्या शतकात होऊन गेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स.१८५६च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि.०६ एप्रिल १८५६ हा होता.
इ.स.१८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. इ.स.१४५९मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापूरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्षे महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली अशा विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना स्वामींची दीक्षा मिळाली. ते फार मोठे शिष्य होऊन गेले आहेत. इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या त्यांच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
स्वामी समर्थांनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे नाटक केले आहे. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्य करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील, अशी त्यांच्या भक्तमंडळींची श्रद्धा व विश्वास आहे. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि.३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे “वटवृक्ष समाधी मठ स्थानी” माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले.
!! अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या पावन चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम !!


– संकलन व शब्दांकन –
संतचरणरज: बापू- श्रीकृष्णदास निरंकारी.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज चौक,
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त मधुभाष- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here