Home चंद्रपूर चिमूर व्यापारी असोशियशनचा पारिवारिक स्नेहसंमेलन तथा वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न चिमूर

चिमूर व्यापारी असोशियशनचा पारिवारिक स्नेहसंमेलन तथा वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न चिमूर

43

– चिमूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या चिमूर व्यापारी असोशियशन चिमूरचा पारिवारिक स्नेहसंमेलन तथा वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न झाली, या संमेलनाला चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.
चिमूर व्यापारी असोशीयन चिमूरच्या वतीने दिनांक ७ एप्रिल २०२४ रोज रविवारला वार्षिक आमसभा व पारिवारिक स्नेहसंमेलन श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कीर्तीकुमार भांगडीया होते. तसेच चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघचे जिल्हा अध्यक्ष सदानंद खत्री, सचिव विवेक पत्तीवार, कोषाध्यक्ष अनिल गुप्ता, उपाध्यक्ष प्रकाश पामपट्टेवार, राजेश शाहू, बंडू जावलेकर, माजी अध्यक्ष नीलम राचलवार, भीमराव ठावरी, चिमूर व्यापारी असोशीयशनचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, उपाध्यक्ष श्याम बंग, सचिव बबन बनसोड, मंगेश चांदेकर, स्वप्नील बघेल, धनराज मुंगले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पतीच्या निधनानंतर खंबीरपने व्यवसाय सांभाळुन व्यापारी व्यवसायात स्थान टीकविनाऱ्या श्रीमती वर्षा दीपक शेडामे, छबुताई पांडूरंग बारापात्रे, सरिता महेश सातपुते तसेच गुणवंत विद्यार्थी व प्रतिष्ठित व्यापारी यांचा सन्मान करण्यात आला. सदाबहार गीताच्या मैफीलिने स्नेहमिलन कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. भारतीय जनता पक्षाच्या राज्य महिला अध्यक्षा चित्रा वाघ बालाजी महाराज यांचे दर्शना करीता आले असता कार्यक्रमस्थळी येऊन स्नेहसंमेलन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम राचलवार, संचालन बबन बनसोड, सोनू जाखोटीया यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळू सातपुते यांनी केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here